Tamil Nadu Congress MLA oath controversy|तामिळनाडूमध्ये शपथविधीवेळी काँग्रेस आमदाराने घेतले राहूल गांधींचे नाव!

आमदार राजेश कुमार यांच्‍या कृतीवर राज्‍यपालांनी घेतला आक्षेप
Tamil Nadu Congress MLA oath controversy
काँग्रेस आमदार एस. राजेश कुमार मंत्रिपदाची शपथ घेत असताना, त्यांनी व्यासपीठावरून काँग्रेस नेत्यांचा जयघोष केल्याने नवा वाद निर्माण झाला. Pudhari
Published on
Updated on

Tamil Nadu Congress MLA oath controversy

चेन्नई: तामिळनाडूमध्ये काँग्रेससाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. तब्बल ५९ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. १९६७ नंतर काँग्रेस पहिल्यांदाच तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात सामील झाली आहे. मात्र, हा ऐतिहासिक क्षण एका वादाशिवाय पूर्ण होऊ शकला नाही. काँग्रेस आमदार एस. राजेश कुमार मंत्रिपदाची शपथ घेत असताना, त्यांनी व्यासपीठावरून काँग्रेस नेत्यांचा जयघोष केल्याने नवा वाद निर्माण झाला. नवीन मंत्र्यांना शपथ देणारे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी यावर तात्काळ आक्षेप घेतला.

काँग्रेसच्‍या दोन आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

किलियूर (Killiyoor) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असणारे राजेश कुमार हे, 'विजय' यांच्या नेतृत्वाखालील 'टीव्हीके' (TVK) सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

Tamil Nadu Congress MLA oath controversy
Rajinikanth on CM Vijay |"मी इतक्‍या खालच्या पातळीचा माणूस नाही": CM विजय यांच्याबद्दल सुपरस्‍टार रजनीकांत नेमकं काय म्‍हणाले?

शपथविधी सोहळ्यावेळी काय झालं?

अधिकृत कागदपत्रावरून शपथेचा मजकूर वाचत असताना, शपथ पूर्ण होताच राजेश कुमार यांनी अचानक काँग्रेस नेते के. कामराज, राजीव गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस नेत्यांच्या या जयघोषावर राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला जागेवरच कडक शब्दांत आठवण करून दिली. राज्यपाल आर्लेकर यांनी हसतमुख चेहऱ्याने पण स्पष्ट शब्दांत सुनावले, "हा तुमच्या शपथेचा भाग नाही." या घोषणाबाजीवर राज्यपालांनी टोकल्यानंतर एस. राजेश कुमार यांनीही हसून दाद दिली आणि ते शपथेच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी पुढे गेले.

Tamil Nadu Congress MLA oath controversy
AIADMK Split Tamil Nadu|तामिळनाडूत विश्वासदर्शक ठरावानंतर AIADMK मध्ये फूट! १३ विद्यमान आमदारांसह २९ नेत्यांवर कारवाई

शपथविधी सोहळ्याचा व्‍हिडिओ व्‍हायरल

शपथविधी सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये एस. राजेश कुमार हे, "तामिळनाडूतील काँग्रेसचे दिवंगत दिग्गज नेते के. कामराज यांचे नाव अमर राहो", "भारतरत्न राजीव गांधी अमर राहो" आणि "लोकनेते राहुल गांधी अमर राहो", अशा घोषणा देताना दिसत आहेत. हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला आहे.

Tamil Nadu Congress MLA oath controversy
Tamil Nadu Election Result : ‘बिहारी अस्मिता’, ‘धोनी’मुळे तामिळनाडुत सत्तांतर! प्रशांत किशोर ठरले ‘थलपती’च्या विजयाचे शिल्पकार

काँग्रेस 'टीव्हीके' सरकारमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष

तामिळनाडू विधानसभेत ५ आमदार असलेली काँग्रेस 'टीव्हीके' सरकारमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला निवडणुकीत बहुमत न मिळाल्यामुळे काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला. काँग्रेसने आपली जुनी मैत्रीण असलेल्या 'डीएमके' (DMK) सोबतची युती तोडून सर्वात आधी 'टीव्हीके'ला पाठिंबा जाहीर केला होता.

Tamil Nadu Congress MLA oath controversy
Assembly Election Results 2026 | "राजकीय भूकंपाचे धक्के २०२९ पर्यंत जाणवणार!" : ओमर अब्दुल्लांच्या 'त्या' पोस्टने खळबळ

मंत्रिमंडळात टीव्‍हीकेचे २१ आमदार

काँग्रेस गेल्या २० वर्षांपासून डीएमकेची मित्रपक्ष राहिली असली, तरी राज्यातील डीएमकेच्या मंत्रिमंडळात ते कधीही सामील झाले नव्हते.अभिनेते आणि नेते जोसेफ विजय यांनी १० मे रोजी मुख्यमंत्री म्हणून इतर ९ मंत्र्यांसह शपथ घेतली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला, ज्यामध्ये 'टीव्हीके'च्या २१ आणि काँग्रेसच्या २ आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news