Assembly Election Results 2026 | "राजकीय भूकंपाचे धक्के २०२९ पर्यंत जाणवणार!" : ओमर अब्दुल्लांच्या 'त्या' पोस्टने खळबळ

Assembly Election Results 2026 | सोशल मीडियावर सूचक पोस्‍ट करत चार राज्‍यांमधी विधानसभा निकालावर व्‍यक्‍त केले आश्‍चर्य
Assembly Election Results 2026
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला.pudhari
Published on
Updated on

Assembly Election Results 2026

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांसह पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया एका खास शैलीत व्यक्त केली आहे. आज (दि. ४ मे) सकाळी मतमोजणीचे कल पाहून त्यांनी एका अनौपचारिक ब्रिटिश वाक्प्रचाराचा वापर करत आपल्या भावनांना वाट करून दिली. तसेच पुन्हा पोस्ट करत या निकालाचे कोणते पडसाद उमटतील यावरही भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणूक निकालावर व्‍यक्‍त केले आश्चर्य

आजसकाळी ११ वाजता ओमर अब्दुल्ला यांनी 'X' वर "ब्लडी हेल" (Bloody hell) अशी पोस्ट केली आणि सोबत आश्चर्याची भावना दर्शवणारा इमोजीही टाकला.

Assembly Election Results 2026
West Bengal Election Results 2026 Live: भाजपने बहुमताचा आकडा केला पार, टीएमसी १२३ जागांवर आघाडीवर

राजकीय भूकंपाचे धक्के २०२९ पर्यंत जाणवणार!

त्यानंतर केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले की, ते पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये घडणारा "राजकीय भूकंप" पाहत आहेत. या निकालांचे पडसाद दीर्घकाळ आणि दूरवर उमटतील. कदाचित २०२९ च्या निवडणुकांपर्यंत या राजकीय भूकंपाचे धक्के जाणवत राहतील," असे भाकीत अब्दुल्ला यांनी वर्तवले आहे.

Assembly Election Results 2026
Assembly Election Results 2026 | प. बंगाल, केरळ अन् तामिळनाडूत सत्तांतर; 'थलपती' विजयची ऐतिहासिक झेप, ममतांचा किल्ला ढासळणार?

पश्‍चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये धक्कादायक कल

आज दुपारी एकवाजेपर्यंत भाजप ज्या राज्याला 'मिशन इम्पॉसिबल' मानत होती, त्या पश्चिम बंगालमध्ये तब्बल १९३ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर ढकलत सर्वांनाच थक्क केले आहे. तर तामिळनाडूत अभिनेते विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने आपल्या पहिल्याच निवडणुकीत धमाका केला असून १०८ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी द्रमुकसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, द्रमुक ५६ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. या निकालामुळे राज्यातील 'द्रविडी' पक्षांच्या (DMK आणि AIADMK) अनेक वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे.

Assembly Election Results 2026
Tamil Nadu Election Results 2026 | एका सिनेमावरुन थेट जयललितांशी पंगा; 'थलाइवा'च्या संघर्षाने तमिळनाडूचं राजकारण कसं बदललं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news