Tamannaah Bhatia: 'दुधिया बदन...' टिप्पणीवर तमन्ना भाटिया पहिल्यांदाच बोलली; अन्नू कपूर यांना दिलं चोख प्रत्युत्तर

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या सौंदर्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर अखेर तमन्नाने मौन सोडले आहे.
Tamannaah Bhatia reacts doodhiya badan remark
Tamannaah Bhatia, Annu KapoorFile Photo
Published on: 
Updated on: 

Tamannaah Bhatia reacts doodhiya badan remark

नवी दिल्ली: प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि मोहक सौंदर्यासाठी ओळखली जाते. गेल्या वर्षी एका पॉडकास्टदरम्यान, ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियाच्या शरीराचे वर्णन करताना 'दुधिया बदन' असे शब्द वापरले होते. या विधानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा गदारोळ झाला आणि अन्नू कपूर यांच्यावर जोरदार टीकाही झाली. आता, या विषयावर तमन्ना भाटियाने मौन सोडले असून, अन्नू कपूर यांच्या टिप्पणीला अप्रत्यक्षपणे पण चोख प्रत्युत्तर दिले आहे.

'दुधिया बदन' टिप्पणीवर तमन्ना भाटिया काय म्हणाली?

नुकतीच तमन्ना भाटिया एनडीटीव्हीच्या एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान तिला 'दुधिया बदन' या प्रकरणाबद्दल आणि अशा प्रकारच्या टिप्पणींकडे ती कशी पाहते, तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.

Tamannaah Bhatia reacts doodhiya badan remark
Tamannaah Bhatia: तमन्नाने गोव्यातील ६ मिनिटांच्या डान्ससाठी घेतले ६ कोटी? पाहा 'तो' व्हायरल व्हिडिओ

"माझ्या मते, एक कलाकार म्हणून आपले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ऐकून घेणे. पण एकदा का आपण गोष्टी ऐकल्या, की त्यातील काय स्वीकारायचे आणि काय सोडून द्यायचे, हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. मी अशा गोष्टींकडे लक्षही देत ​​नाही. एक स्त्री म्हणून, मी अशा टिप्पणींना अजिबात महत्त्व देत नाही, कारण अशा गोष्टी केवळ पुढे जाण्याच्या मार्गात अडथळा ठरतात."

"मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि ते अधिक उत्तम कसे करता येईल, याचा प्रयत्न करते. शेवटी, मी माझ्या कामाकडे एक सेवा म्हणून पाहते आणि भविष्यातही मी याच पद्धतीने काम करत राहणार आहे," असे तमन्नाने म्हटले आहे.

अन्नू कपूर काय म्हणाले होते?

'स्त्री २' चित्रपटातील 'आज की रात' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर, सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टवर बोलताना अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियाबद्दल 'दुधिया बदन' अशी टिप्पणी केली होती, ज्यावर मोठी टीका झाली होती. मात्र, नंतर अन्नू कपूर यांनी असेही म्हटले होते की, त्यांच्या विधानांचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला गेला होता आणि त्यांनी तमन्नाची माफी मागण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

तमन्नाचा पुढचा चित्रपट

अभिनेत्री तमन्ना भाटियाचा मागील चित्रपट द वन बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. तिच्या आगामी प्रकल्पाबद्दल सांगायचे तर, या चित्रपटाचे नाव रागिनी एमएमएस ३ असे असून, याची निर्मिती एकता कपूर करत आहे. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Tamannaah Bhatia reacts doodhiya badan remark
Saif Ali Khan: सैफ अली खानने वांद्रेतील ७९७ चौरस फुटांचा फ्लॅट ४.११ कोटी रुपयांना विकला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news