Sunjay Kapur property dispute|"या वादापुढे महाभारतही लहान ...": संजय कपूर मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाची संतप्त टिप्पणी

'रघुवंशी इन्व्हेस्टमेंट्स'च्या बैठकीला स्थगिती देण्‍यासाठी राणी कपूर यांची याचिका
Sunjay Kapur property Case
संजय कपूर आपली आई राणी कपूर, पत्‍नी प्रिया कपूर व मुलांसमवेत.File photo.
Published on
Updated on

Sunjay Kapur property dispute

नवी दिल्ली : "३०,००० कोटी रुपयांच्या वारसाहक्कावरून उद्‍योगपती संजय कपूर मालमत्ता वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज (दि. 12) दुपारी संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 'रघुवंशी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड' (RIPL) च्या १८ मे रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीला स्थगिती देण्याची मागणी त्‍यांनी केली आहे. ही बैठक म्हणजे 'न्यायालयाने दिलेल्या मध्यस्थीच्या आदेशाला बगल देण्याचा फसवा प्रयत्न' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

"या वादापुढे महाभारतही लहान वाटेल..."

न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या अध्‍यक्षतेखालील खंडपीठासमोर राणी कपूर यांच्‍या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्‍यायमूर्ती पारडीवाला म्हणाले: "आम्ही एका आखाड्यात उतरलो आहोत. (या वादापुढे) महाभारतही खूप लहान वाटेल. आम्ही या प्रकरणाची पाहणी करू." न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवार, १४ मे रोजी निश्चित केली आहे.

Sunjay Kapur property Case
Sanjay Kapur Estate Dispute| संजय कपूर मालमत्ता वादात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड 'मध्यस्थ'; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
Sunjay Kapur property Case
Sunjay Kapur property Case| "80 वय कायदेशीर लढाईचे नव्‍हे.." : संजय कपूर मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने कोणता सल्‍ला दिला?

राणी कपूर यांची नेमकी मागणी काय?

दरम्यान, राणी कपूर यांनी संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर यांच्याविरोधातही आदेश देण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत मध्यस्थी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रिया कपूर यांनी फॅमिली ट्रस्टच्या कामात हस्तक्षेप करू नये, असे राणी कपूर यांनी याचिकेत म्हटले आहे. दरम्‍यान, १ मे रोजी प्रिया कपूर यांच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 'जैसे थे' (Status Quo) स्थिती ठेवण्याच्या आदेशाला 'नियमित' आणि 'संतुलित' असल्याचे म्हटले होते. मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या अशीलने स्वेच्छेने तयारी दर्शवली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Sunjay Kapur property Case
Sunjay Kapur property Case | संजय कपूर मालमत्ता वादात अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

माजी सरन्‍यायाधीश यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती

उद्‍योगपती संजय कपूर मालमत्ता वाद प्रकरणी गेल्या आठवड्यात न्यायालयाने भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आहे. ही मध्यस्थी 'आरके ट्रस्ट' आणि 'सोना कॉमस्टार' (Sona Comstar) शी संबंधित कंपन्यांबाबत आहे. राणी कपूर यांनी उच्च न्यायालयात दिवाणी खटला दाखल करून हा ट्रस्ट "बेकायदेशीर, रद्दबातल आणि फसवणूक, बनावटगिरी व अवाजवी प्रभावाचा परिणाम" असल्याचे घोषित करण्याची मागणी केली आहे.

Sunjay Kapur property Case
SUPREME COURT : "सुप्रीम कोर्टात तुमची एंट्रीच बंद करू..." : सरन्यायाधीश सूर्यकांत याचिकाकर्त्यावर का भडकले?

मृत्युपत्रावरून स्वतंत्र कायदेशीर लढाई

या मध्यस्थी प्रक्रियेत दिवंगत संजय कपूर यांच्या मृत्युपत्राचा (Will) समावेश नाही. त्याबाबत प्रिया कपूर आणि संजय कपूर यांची दुसरी पत्नी, अभिनेत्री करिश्मा कपूर यांची मुले कियान आणि समायरा कपूर यांच्यात स्वतंत्र कायदेशीर लढाई सुरू आहे. कियान आणि समायरा यांनी प्रिया कपूर यांच्यावर संजय कपूर यांचे मृत्युपत्र बनावट बनवल्याचा आरोप केला आहे. तरीही, कुटुंबातील सर्व सदस्य मध्यस्थीसाठी उपस्थित राहण्यास तयार झाले आहेत. दरम्‍यान, आणखी एक खटला प्रिया कपूर आणि संजय कपूर यांची बहीण मंधिरा कपूर स्मिथ यांच्यात सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या दोघींना "प्रतिष्ठेने वागण्याचे" आणि एकमेकींविरुद्ध सार्वजनिक विधाने न करण्याचे आदेश दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news