Sunjay Kapur property Case| "80 वय कायदेशीर लढाईचे नव्‍हे.." : संजय कपूर मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने कोणता सल्‍ला दिला?

Sunjay Kapur property Case| राणी कपूर याच्‍या याचिकेवर सुनावणी
Sunjay Kapur property Case
संजय कपूर आपली आई राणी कपूर, पत्‍नी प्रिया कपूर व मुलांसमवेत.File photo.
Published on
Updated on

Supreme Court on Sunjay Kapur property Case

नवी दिल्ली : दिवंगत उद्योजक संजय कपूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२७) महत्त्‍वपूर्ण सल्‍ला दिला. संजय कपूर यांच्या ८० वर्षीय आई राणी कपूर यांना न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांच्या या वयात प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढणे फारसे फायद्याचे ठरणार नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

फसवणूक आणि मालमत्ता हस्तांतरणाचे आरोप

राणी कपूर यांनी असा आरोप केला आहे की, कौटुंबिक ट्रस्ट फसवणुकीने तयार करण्यात आला असून, त्यांच्या संमतीशिवाय 'सोना ग्रुप'च्या महत्त्वाच्या मालमत्तांचे नियंत्रण हस्तांतरित करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. २०१७ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता, त्यानंतर प्रशासकीय कामाचे कारण सांगून त्यांच्याकडून कोऱ्या कागदांवर आणि इतर कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या. त्यांचा दिवंगत मुलगा संजय कपूर आणि सून प्रिया कपूर यांनी त्यांच्या प्रकृतीचा फायदा घेऊन मालमत्ता ट्रस्टकडे वळवली, असा त्यांचा आरोप आहे.

Sunjay Kapur property Case
custodial death case | सत्यमेव जयते! महिला कॉन्‍स्‍टेबलचे धाडस...कोठडीतील हत्या प्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा कशी झाली?

राणी कपूर यांनी घेतली सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव

'सोना ग्रुप' परिवारातील वारसाहक्काच्या संबधी राणी कपूर यांनी एका कौटुंबिक ट्रस्टच्या निर्मितीला आणि कामकाजाला आव्हान दिले आहे. या ट्रस्टमुळे आपल्‍याला संजय कपूर यांच्‍या मालमत्तेपासून वंचित ठेवल्याचा त्यांचा दावा आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम संरक्षण देण्यास आणि प्रलंबित खटल्यादरम्यान मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास नकार दिला होता, त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Sunjay Kapur property Case
Sanjay Kapoor Property Row | करिश्मा कपूर-संजय कपूर घटस्फोटाची कागदपत्रे मिळावीत; प्रिया कपूर यांची सुप्रीम कोर्टात धाव

नेमकी मागणी कोणती?

आपला संपूर्ण वारसा, निवासस्थान आणि इतर जंगम-स्थावर मालमत्ता हिरावून घेतली गेल्याचा आरोप राणी कपूर यांनी केला असून, या मालमत्तांची विल्हेवाट लावली जाऊ नये म्हणून तातडीने संरक्षणाची मागणी राणी कपूर यांनी याचिकेमधून केली आहे.

Sunjay Kapur property Case
Sanjay Kapoor Property Row | "आशीर्वादाचे रूपांतर शापात करू नका": संजय कपूर संपत्ती वाद प्रकरणी हायकोर्टाने ओढले ताशेरे

"80 वय हे कायदेशीर लढाईचे नव्‍हे..."

न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या अध्‍यक्षतेखालील खंडपीठाने राणी कपूर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना निरीक्षण नोंदवले की, "हा कायदेशीर लढा वयाच्या ८० व्या वर्षी सुरू झाला आहे... हे वय कायदेशीर भांडण्याचे नाही." प्रदीर्घ न्यायालयीन लढाईत अडकण्यापेक्षा सर्व पक्षांनी हा विषय सामोपचाराने सोडवावा, असे प्रोत्साहन न्यायालयाने दिले.

Sunjay Kapur property Case
Sanjay Kapoor property dispute | 'मर्यादा राखा...' : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या पत्नी आणि बहिणीला हायकोर्टाने झापले

सर्वोच्‍च न्‍यायालयाने कोणता सल्‍ला दिला?

मोठ्या मालमत्ता आणि अनेक भागधारक सामील असलेला न्‍यायालयीन वाद दीर्घकाळ चालू शकतो, असे स्‍पष्‍ट करत ही एक प्रदीर्घ चालणारी कायदेशीर प्रक्रिया ठरेल. राणी कपूर यांचे वय ८० वर्षे आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी मध्यस्थीचा मार्ग अवलंबून शांततेने हा मुद्दा सोडवणे त्यांच्या हिताचे ठरेल, असा मोलाचा सल्‍ला खंडपीठाने दिलान्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुणवत्तेच्या आधारावर घेणार असल्याचे सांगितले असले तरी, प्रथम दोन्ही पक्षांना तडजोडीसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट केले.

Sunjay Kapur property Case
Sunjay Kapur Assets Case : 'संजय कपूर यांच्‍या मृत्‍यूपर्वीच प्रिया सचदेव यांना कंपनीच्या बोर्डातून काढले होते!'

३०,००० कोटींच्या मालमत्तेसाठी कुटुंबात संघर्ष

संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर आणि दुसरी पत्‍नी अभिनेत्री करिश्मा कपूर यांची मुले यांच्यातील ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मोठ्या वादाचा एक भाग आहे. 'सोना कॉमस्टार'चे माजी अध्यक्ष संजय कपूर यांचे जून २०२५ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी इंग्लंडमध्ये पोलो मॅचदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. करिश्मा कपूर आणि संजय यांची मुले समायरा आणि कियान यांनी संजय कपूर यांच्या मृत्युपत्राला आव्हान दिले आहे. या मृत्युपत्रानुसार मालमत्तेचा मोठा हिस्सा प्रिया आणि त्यांच्या मुलांना देण्यात आला आहे. मात्र, हे मृत्युपत्र बनावट असू शकते आणि त्यातून जवळच्या नातेवाईकांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे, असा दावा मुलांच्या वतीने करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news