

Lavasa Project Sharad Pawar: लवासा हिल स्टेशन प्रकल्पाबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या सर्वांवर गंभीर आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या प्रकरणी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात यावी अशी मागणी या याचिकेतून केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या याचिकेच्या सुनावणीदरम्याम हस्तक्षेप करण्यास आम्ही अजिबात इच्छुक नाही. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या हेतूवरच संशय व्यक्त करत ही याचिका फेटाळली आहे. लवासा प्रकरणातील याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणी पुढारी न्यूजशी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे.
जाधव म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका फेटाळल्यानंतर आम्हाला मोठा धक्का बसला. उच्च न्यायालयाने माझ्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालय असं का करत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात या निर्णयाविरूद्ध मोठ्या खंडपीठाकडे दाद मागण्याबाबत आम्ही कायदेशील सल्ला घेत आहोत.
जाधव पुढे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालायने दिलेला निकाल हा चुकीचा असून माझ्याकडे सबळ पुरावे होते. १४ वर्षांचा संघर्ष करून आज याचिका फेटाळल्याने खूप वाईट वाटले. चौदा वर्षाक पवार कुटुंबीयांनी कधीही त्रास दिला नाही. माझ्या मनात कधी भीती नव्हती.