Supreme Court: "तुम्ही या खुर्चीवर बसण्यास पात्र नाही" संतप्त वकीलाची थेट सरन्यायाधीशांवरच आगपाखड, नेमकं काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयात एक अभूतपूर्व प्रकार समोर आला आहे. एका संतप्त झालेल्या एका वकीलाने थेट सरन्यायाधीशांच्या कामकाजावर आणि पात्रतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Supreme Court: "तुम्ही या खुर्चीवर बसण्यास पात्र नाही" संतप्त वकीलाची थेट सरन्यायाधीशांवरच आगपाखड, नेमकं काय घडलं?
Published on: 
Updated on: 

Supreme Court lawyer outburst

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात एक अभूतपूर्व प्रकार समोर आला आहे. दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध न केल्यामुळे संतप्त झालेल्या एका वकीलाने थेट सरन्यायाधीशांच्या कामकाजावर आणि पात्रतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकारामुळे न्यायालयात काही काळ खळबळ उडाली.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयात खंडपीठासमोर मोटार अपघात दाव्यांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी सुरू असताना हा वाद निर्माण झाला. २ नोव्हेंबर रोजी एक याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला कळवूनही ती अद्याप पटलावर आली नाही, असा आक्रमक पवित्रा संबंधित वकीलाने घेतला.

Supreme Court: "तुम्ही या खुर्चीवर बसण्यास पात्र नाही" संतप्त वकीलाची थेट सरन्यायाधीशांवरच आगपाखड, नेमकं काय घडलं?
Supreme Court: पत्नीला ‘मूर्ख’ किंवा ‘काही कामाची नाही’ म्हणणे क्रूरता ठरत नाही: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

न्यायालयाचा आक्षेप आणि वकीलाचा संताप

कोणतीही पूर्वसूचना किंवा अर्ज न देता अचानक सुनावणीच्या वेळी मध्यंतरी हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. याचिका लवकरात लवकर सूचीबद्ध करण्याच्या विनंतीसाठी संबंधित रजिस्ट्रारशी संपर्क साधावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

मात्र, यावर वकीलाचा संताप अनावर झाला. "मी आधीच माफी मागितली आहे, पण मला आता स्पष्टीकरण हवे आहे की याचिका अद्याप का सूचीबद्ध केली गेली नाही?" असा सवाल त्याने केला. जेव्हा सरन्यायाधीशांनी हे प्रकरण पाहण्याचे आश्वासन दिले, तेव्हा वकील आणखी भडकले आणि म्हणाले, "नाही, मी अजिबात प्रतीक्षा करणार नाही. तुम्ही या खुर्चीवर बसण्यास योग्य नाही. तुमच्यात त्यासाठी आवश्यक असलेला प्रामाणिकपणा नाही."

प्रशासकीय प्रक्रिया आणि बारचा निषेध

या सर्व प्रकारानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, याचिकांची वर्गवारी आणि त्यांची सूची तयार करण्याचे काम न्यायालयाचे संगणकीय प्रणालीद्वारे होते आणि यात सरन्यायाधीशांची कोणतीही वैयक्तिक भूमिका नसते. ६ नोव्हेंबरपूर्वी काही याचिका दाखल झाल्या होत्या, त्यानंतर दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे न्यायालय एक आठवडा बंद होते, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, न्यायालयाच्या कामकाजात अशा प्रकारे शिस्त मोडल्याबद्दल आणि सरन्यायाधीशांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याबद्दल बारच्या काही ज्येष्ठ सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, संबंधित वकीलावर न्यायालयाचा अवमान करण्याची कारवाई करावी, अशी औपचारिक मागणी त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली आहे.

Supreme Court: "तुम्ही या खुर्चीवर बसण्यास पात्र नाही" संतप्त वकीलाची थेट सरन्यायाधीशांवरच आगपाखड, नेमकं काय घडलं?
Supreme Court : वडिलांच्या ताब्यात असलेल्या आजोबांच्या मालमत्तेवर नातू हक्क सांगू शकतो का? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निकाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.