

Earthquake in Delhi : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी ९.०४ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले.सुरुवातीच्या माहितीनुसार,4.4 तीव्रतेचा भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील रोहतक येथे होता. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये हा तिसरा भूकंप धक्का आहे. यापूर्वी १७ फेब्रुवारी आणि १९ एप्रिल रोजीही भूकंपाचे धक्के बसले होते.
दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) परिसराला भूकंपाचा जोरदार धक्का बसला. याचे हादरे उत्तर भारतातील अनेक भागांतही जाणवले.या भूकंपामुळे इमारती हादरल्याने, घाबरलेले रहिवासी घराबाहेर मोकळ्या जागेकडे धावले. तथापि, या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या झज्जर येथे सकाळी ९.०४ वाजता 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भाग राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे आणि दिल्लीपासून जवळजवळ ६० किलोमीटर अंतरावर आहे. एनसीआरमधील दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद येथे भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील सोनीपत, रोहतक आणि हिसार येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
आज सकाळी दिल्लीत परिसरात सुमारे १० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. ANIशी बोलताना एकाने सांगितले की, "भूकंपाचे धक्के जाणवले. ते खरोखरच भयानक होते, माझे वाहन हादरले. भूकंपाचा धक्का खरोखरच जोरदार होता."
१९ एप्रिल रोजी दुपारी १२:१७ वाजता अफगाणिस्तानमध्ये रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेचा भूकंप आला. त्याचा फटका जम्मू-काश्मीर आणि दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवला हाेता. यावेळी कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नव्हती.
झज्जरमध्ये दोन मिनिटांत दोन भूकंपाचे धक्के जाणवले. झज्जरमध्ये सकाळी ९:०७ वाजता पहिला भूकंपाचा धक्के जाणवला. त्यानंतर सकाळी ९:१० वाजता सौम्य धक्के जाणवले. अचानक आलेल्या भूकंपाच्या धक्क्याने घबराट पसरल्याने लोक घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पडले. झज्जरला लागून असलेल्या बहादुरगडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भिवानी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. भिवानीलाही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.