

Philippines earthquake 2025
मिंडानाओ : फिलीपिन्स आज पहाटे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरलं. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीनुसार, मिंडानाओ बेटाला ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी हा भूकंप झाला.
नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे शनिवारी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १०५ किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपाची माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीने (NCS) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एका पोस्टद्वारे दिली. एनसीएसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "२८ जून २०२५ रोजी सकाळी ४:३७ वाजता फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे ६.० तीव्रतेचा भूकंप झाला."