Taiwan Earthquake
तैवानचा पूर्व किनारा बुधवारी भूकंपाने हादरला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवली गेली, अशी माहिती तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाने दिली. हा भूकंप भूगर्भात ३०.९ किमी खोलवर झाला. यामुळे कसल्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
यावर्षी तैवानमध्ये एप्रिल आणि जानेवारीमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जानेवारीत झालेल्या भूकंपामुळे तैवानमध्येही मोठे नुकसान झाले होते. तैवान हे प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित असून हे क्षेत्र भूकंपांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते. हे क्षेत्र दोन टेक्टोनिक प्लेट्सदरम्यान स्थित आहे. यामुळे या क्षेत्रात वारंवार भूकंपाचे हादरे बसतात. येथे २०१६ मध्ये झालेल्या भूकंपात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर १९९९ मधील ७.३ तीव्रतेच्या भूकंपामुळे २ हजारहून अधिक लोकांचा बळी गेला होता.