Sonia Gandhi Instagram: सोनिया गांधींचे इन्स्टाग्रामवर पदार्पण; पहिल्याच पोस्टमध्ये शेअर केली आत्मचरित्राची झलक

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या जगात पाऊल ठेवले आहे. त्यांनी 'इन्स्टाग्राम' आणि 'एक्स' वर आपले अधिकृत खाते सुरू केले आहे.
Sonia Gandhi Instagram:
Sonia Gandhi Instagram:File Photo
Published on: 
Updated on: 

Sonia Gandhi Instagram

नवी दिल्ली: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या जगात पाऊल ठेवले आहे. त्यांनी 'इन्स्टाग्राम' आणि 'एक्स' वर आपले अधिकृत खाते सुरू केले आहे. इंस्टाग्रामवरील पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आपल्या आत्मचरित्राबद्दल माहिती दिली आहे. हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार असून, या पोस्टमध्ये त्यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ दाखवले आहे.

पोस्टमध्ये सोनिया गांधी काय म्हणाल्या?

इन्स्टाग्रामवरील आपल्या पहिल्याच पोस्टमध्ये सोनिया गांधींनी लिहिले आहे की, "सर्वांना नमस्कार! हा खास क्षण तुमच्यासोबत शेअर करताना मला अतिशय आनंद होत आहे. सादर आहे 'बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह'चा पहिला लुक. ही कथा प्रेम, कर्तव्य, दुःख आणि आपलेपणा शोधण्याच्या प्रवासाची आहे. हे पुस्तक तुमच्या हाती सुपूर्द करण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे."

Sonia Gandhi Instagram:
Amit Shah Punjab visit: पंजाबमधून २०२९ पर्यंत अमली पदार्थ हद्दपार करू: अमित शहा

या पोस्टसोबत शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला सोनिया गांधी यांच्या हातात पुस्तकाची प्रत सोपवताना दिसत आहे. तसेच, त्या महिला सोनिया गांधी यांच्यासाठी गोडधोड घेऊन आल्याचे आणि त्यांची कन्या व काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वड्रा या सोनिया गांधींना ती मिठाई भरवत असल्याचेही या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

आत्मकथेतून कोणत्या रहस्यांवरून पडदा उठणार?

सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात त्यांच्या इटलीतील बालपणापासून ते माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याशी झालेली भेट आणि लग्नापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, त्यांचा राजकारणातील प्रवेश आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे २००४ मध्ये स्पष्ट बहुमत असूनही त्यांनी पंतप्रधानपद का नाकारले, याबाबतचा खुलासा या आत्मकथेत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि वाचकांमध्ये या पुस्तकाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Sonia Gandhi Instagram:
Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचे राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news