Sonia Gandhi Fitness Routine : ७९ व्या वर्षीही फिट अँड हेल्दी! सोनिया गांधींच्या रोजच्या आहारात असतो 'हा' पदार्थ

ना पिझ्झा, ना पास्ता! सोनिया गांधी रोज खातात हा देसी पदार्थ; जाणून घ्या फिटनेसचे रहस्य
Sonia Gandhi Fitness Routine
Sonia Gandhi Fitness Routine : ७९ व्या वर्षीही फिट अँड हेल्दी! सोनिया गांधींच्या रोजच्या आहारात असतो 'हा' पदार्थfile photo
Published on: 
Updated on: 

sonia gandhi fitness routine at 79 age she eats dal chawal daily for healthy body

पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी वयाच्या ७९ व्या वर्षीही फिट आणि निरोगी आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यामागे साधा आणि संतुलित आहार हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. त्यांना भारतीय खाद्यपदार्थ विशेष आवडतात. निरोगी राहण्यासाठी त्या साधी जीवनशैली आणि नियमित दिनचर्येचे पालन करतात. जाणून घेऊया त्यांचा फिटनेस रुटीन आणि आहाराविषयी...

Sonia Gandhi Fitness Routine
संतापजनक! मुंबई लोकलमध्ये छेडछाडीला विरोध करताच तरुणीला ढकलले रुळांवर; ट्रेनखाली गमावला एक हात

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी सध्या त्यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या पुस्तकाला आत्मचरित्र म्हटले जात असून, त्यासंदर्भातील अनेक गोष्टी त्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शेअर करत आहेत. सोनिया गांधी ७९ वर्षांच्या झाल्या असल्या तरी आजही त्या निरोगी आहेत. त्यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारावरही मात केली आहे.

अलीकडेच एका व्हिडिओमध्ये सोनिया गांधी यांनी आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी एका अशा घरगुती पदार्थाचा उल्लेख केला, जो त्या दररोज खातात. हा पदार्थ खाल्ल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. जाणून घेऊया त्यांची दिनचर्या आणि आहाराच्या सवयी.

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय करतात सोनिया गांधी?

सोनिया गांधी यांना सकाळी उठल्यानंतर उद्यानात फेरफटका मारायला आवडते. त्यानंतर त्या योगासने करतात. सकाळी योगासने आणि ध्यान केल्यामुळे मन शांत राहण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. त्या अनेक वर्षांपासून नियमितपणे योगाभ्यास करत आहेत. आता तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

Sonia Gandhi Fitness Routine
Navapanchama Yoga : १२ नोव्हेंबरला गुरु-चंद्राच्या युतीतून नवपंचम योग! ३ राशींना होऊ शकतो धनलाभ

सकाळी घेतात हे पेय

सोनिया गांधी सकाळी उठल्यानंतर कॉफी पिणे पसंत करतात. तर हिवाळ्यात त्या संत्र्याचा रस पितात. त्यांना गोड पदार्थ किंवा जंक फूड खाणे अजिबात आवडत नाही. मूळच्या इटलीच्या असूनही त्यांना पिझ्झा, पास्ता किंवा इतर फास्ट फूड पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, कॉफी त्यांना विशेष आवडते.

नाश्त्यामध्ये त्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करतात. तर दुपारचे आणि रात्रीचे जेवण हलके व साधे ठेवण्यास त्या प्राधान्य देतात.

रोज खातात हा साधा घरगुती पदार्थ

सोनिया गांधी यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, त्या दररोज तूरडाळ आणि भात खातात. त्यांच्यासाठी हा अगदी घरगुती आणि पारंपरिक जेवणाचा प्रकार आहे. तूरडाळ-भात खाल्ल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. डाळ, भात, पोळी आणि भाजी हे पदार्थ त्यांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात खायला आवडतात. कधी कधी त्या फक्त डाळ-पोळीही खातात.

याशिवाय चिकन टिक्का, चिकन तंदुरी, कबाब, काश्मिरी कोफ्ता, बंगाली खाद्यपदार्थ, दाल मखनी आणि गुजराती पदार्थही त्यांना आवडतात. भारतीय खाद्यपदार्थांची आपण मोठी चाहती असल्याचे त्या सांगतात. भारतीय पदार्थ बनवण्याची आणि ते वाढण्याची पद्धत तसेच त्यांची चव आपल्याला विशेष आवडते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

फिट राहणे का आहे महत्त्वाचे?

सोनिया गांधी यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा दोन वेळा सामना केला असून, त्यावर मात करून त्या आजही सक्रिय आहेत. त्यांच्या आहाराच्या सवयी आणि दिनचर्येची सध्या चर्चा होत आहे. साधा आणि संतुलित आहार घेणे, शरीर सक्रिय ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सोनिया गांधी जंक फूडपासून दूर राहतात, आहार साधा ठेवतात आणि सकाळी योगासने करतात. नियमित हालचाल आणि संतुलित जीवनशैलीला महत्त्व दिल्यामुळे वाढत्या वयातही आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.