संतापजनक! मुंबई लोकलमध्ये छेडछाडीला विरोध करताच तरुणीला ढकलले रुळांवर; ट्रेनखाली गमावला एक हात

संबंधित महिला चार वर्षांच्या मुलाची आई आहे.
Woman pushed onto tracks after resisting molestation
संतापजनक! मुंबई लोकलमध्ये छेडछाडीला विरोध करताच तरुणीला ढकलले रुळांवर; ट्रेनखाली गमावला एक हातfile photo
Published on: 
Updated on: 

Woman pushed onto tracks after resisting molestation on Mumbai local train; loses an arm under the train

पुढारी ऑनलाईन : बोरीवलीहून नायगावला जाण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये चढलेल्या २० वर्षीय तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्‍न झाला. त्‍याला विरोध करताच त्‍या तरूणील रेल्वेरूळावर ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Woman pushed onto tracks after resisting molestation
Navapanchama Yoga : १२ नोव्हेंबरला गुरु-चंद्राच्या युतीतून नवपंचम योग! ३ राशींना होऊ शकतो धनलाभ

त्‍या तरूणीचे नाव सोफिया अस्लम खान असे असल्याचे समोर आले आहे. नायगाव स्थानकावर सोफियाने या प्रकाराला विरोध केला असता, आरोपीने तिला प्लॅटफॉर्मवरून थेट रेल्वे रुळांवर ढकलल्याचा आरोप आहे. याचदरम्यान लोकल ट्रेन सुरू झाल्याने सोफियाचा एक हात कापला गेला. चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाची आई असलेल्या सोफियाच्या आयुष्यात या घटनेमुळे मोठे संकट उभे राहिले आहे.

Woman pushed onto tracks after resisting molestation
Anirudh Ravichander-Kavya Maran: कोण आहे अनिरुद्ध रविचंदर? ज्याच्याशी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने बांधली लग्नगाठ

या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच पीडितेला योग्य नुकसानभरपाई आणि शासनाकडून आवश्यक ती आर्थिक मदत मिळाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात कोणालाही आपल्या बहिणी-मुलींसोबत असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही अशी नागरिकांतून भावना व्यक्त होत आहे.

या प्रकारामुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही मोठी आहे. कार्यालयीन कामकाज, घरी जाण्यासाठी किंवा इतर कोणत्‍याही इच्छित ठिकाणी जाण्यासाठी मुंबईमध्ये लोकल ट्रेनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्‍यातच एका महिलेसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.