

Sonia Gandhi Book Controversy: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे पुस्तक बिलाँगिंगः अ जर्नी ऑफ लव्ह हे पुस्तक प्रकाशनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आता याबाबत पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने आपली बाजू मांडली असून त्यांनी सोनिया गांधी यांचे हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. मात्र लेखकाने मांडलेल्या गोष्टींचे तथ्य तपासणे त्यांची जबाबदारी आणि अधिकार आहे.
पेंग्विन इंडियाने एक्सवर पोस्ट करत या संपूर्ण प्रकरणी आपली बाजू मांडली. आम्ही भारतात याचे प्रकाशक नाहीये.
माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार सोनिया गांधी या पुस्ताकत कोणतेही संपादकीय बदल करण्यास तयार नाहीत. त्यानंतर प्रकाशकांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यापासून काढता पाय घेतला. आता त्यावर पेंग्विनने स्पष्टीकरण दिले आहे.
कंपनीने पोस्टमध्ये लिहिलं की, 'ते 'बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव' चे भारतात प्रकाशक नाहीयेत. लेखिकेने संपादकीय बदलाव करण्यास नकार दिल्यानं त्यांनी प्रकाशन करण्यास नकार दिला या दाव्यात देखील तथ्य नसल्याचं सांगितलं. लेखिकेला तथ्यांच्या बाबतीत चांगला सल्ला देणे ही प्रकाशकाची जबाबदारी आहे. प्रकाशनाची ही सामान्य प्रक्रिया आहे. लेखिकेसोबत झालेल्या गोपनीय संभाषणावर ते कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाहीत.'
पेंग्विनच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारचा दबाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेता अशोक गहलोत यांनी दावा केला की पेंग्विनवर पंतप्रधान, आरएसएस, चीनने भारतीय क्षेत्रावर केलेले अतिक्रमणाबाबतचा भाग पुस्तकातून हटवण्यासाठी दवाब होता. सोनिया गांधी यांनी ज्यावेळी हे बदल करण्यास नकार दिला त्यानंतर कंपनीने भारतात याचे प्रकाशन करण्यास नकार दिला. गहलोत यांनी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं सांगितलं.
गहलोत यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी पेंग्विनवर टीका केली की जर जगभरात त्यांच्या इम्प्रिंट अंतर्गत हे पुस्तक प्रकाशित होत आहे तर फक्त भारतात याच्या प्रकाशनाला का थांबवलं जात आहे. कमलनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, आता काय प्रकाशक सोनिया गांधींसारख्या वरिष्ठ व्यक्तींना सांगणार की त्यांनी काय लिहावं अन् काय लिहू नये. विशेष म्हणजे प्रकाशक ही बाब स्वतः म्हणतोय की त्याच्यावर कोणाचा दबाव आहे."
भारतात या पुस्तक प्रकाशनाबाबत आणि वितरणाबाबत स्थिती अजून स्पष्ट झालेली नाही. मात्र अमेझॉनवर याचे ई बूक व्हर्ज २६१५ रूपयात प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. अमेझॉनच्या मते ई-बूक हार्पर कॉलिन्स युकेच्या विलियम कॉलिन्सने प्रकाशित केलं आहे.