

Sonia Gandhi Vande Mataram: देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात देखील ध्वाजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पूर्ण वंदे मातरंम गायलं गेलं. मात्र यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी नाराज झाल्याचे दिसून आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले. त्यानंतर आता काँग्रेसकडून जयराम रमेश यांचे स्पष्टीकरण आले आहे. काँग्रेस मुख्यालयात सेवा दलाकडून ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
भाजप प्रवक्ता आर. पी. सिंह यांनी सोनिया गांधी यांनी वंदे मातरम् थांबवण्यास सांगितल्याचा आरोप केला. त्यांनी एक्स पोस्ट करून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले. त्यांनी ज्यावेळी वंदे मातरम गायलं जात होतं त्यावेळी सोनिया गांधी कथितरित्या नाराज झाल्या. त्यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना हे थांबवण्यास सांगितलं. सिंह यांनी सोनिया यांना वंदे मातरमचा एवढा का द्वेश आहे असा सवाल देखील केला.
यावर आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी वंदे मातरम् वरून कोणता वाद झालेला नाही असं सांगितलं. 'वंदे मातरम् बाबत ऑक्टोबर १९३७ मध्ये काँग्रेसच्या कार्यसमितीमध्ये बैठक झाली होती. त्यात गांधीजी, नेताजी सुभाष चंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद, चक्रवर्ती गाजगोपालचारी आणि पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. या बैठकीत गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानंतर वंदे मातरम् काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये गायलं जाईल असा निर्णय घेण्यात आला होता. रविंद्रनाथ टागोर यांनीच याचे पहिले कडवे वापरा असा सल्ला दिला होता. तेव्हापासून काँग्रेसच्या अधिवेशनात आम्ही कार्यकर्ते आणि सर्व लोक वंदे मातरम् गीत गातो. यात वाद काही नाही.
काँग्रेसने यावर, स्टेजच्या समोर दोन कॅमेरेमन आणि काही कार्यकर्ते हालचाल करत होते. तसेच सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्चीची सोय करण्यात यावी अशी मागणी करत होत्या. ते एक वयस्कर व्यक्ती असून ते खूप वेळापासून उभे होते. हे सांगत असतानाच वंदे मातरम् वाजलं. यामुळं यात वंदे मातरम् बाबत कोणतीही गोष्ट नव्हती. सोनिया गांधी यांच्याकडून व्यवस्था करण्याबाबत सुचना केल्या जात होत्या. असं स्पष्टीकरण दिलं.