Sonia Gandhi १९८० मध्ये भारतीय नागरिक नव्हत्या, तरीही त्यांचे नाव मतदार यादीत; दिल्ली पोलिसांची न्यायालयात माहिती

Sonia Gandhi 1980 voter list : राऊस अव्हेन्यू न्यायालयाने पोलीस ठाण्याकडून मागवला होता 'ॲक्शन टेकन रिपोर्ट'
Sonia Gandhi 1980 voter list
Sonia Gandhi 1980 voter list file photo
Published on: 
Updated on: 

Sonia Gandhi 1980 voter list : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी १९८० मध्ये भारतीय नागरिक नव्हत्या, तरीही त्या वर्षीच्या मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट होते, अशी माहिती आज (दि. २८ नोव्हेंबर) दिल्ली पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयास दिली.

नेमकी तक्रार काय?

एप्रिल १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवण्यापूर्वी, सुमारे तीन वर्षे आधीच काँग्रेस नेत्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या संदर्भात, राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आयपी इस्टेट पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊस ऑफिसरकडून (SHO) 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' (ATR) मागवला होता, ज्याच्या उत्तरात पोलिसांनी ही माहिती दिली.

Sonia Gandhi 1980 voter list
Sonia Gandhi Book Controversy: सोनिया गांधींच्या पुस्तकातील दोन पानांवरून वाद; सावरकर कुटुंबीय आक्रमक, पाठवली कायदेशीर नोटीस

तक्रारदाराने केली होती तपासणीची मागणी

सोनिया गांधी भारतीय नागरिक नसताना १९८० च्या मतदार यादीत त्यांचे नाव कसे काय असू शकते, असा प्रश्न या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. तक्रारदाराने या प्रकरणाला संभाव्य 'बनावटगिरी' (forgery) असल्याचे संबोधत, त्याबाबत पोलीस तपासाची मागणी केली आहे.

Sonia Gandhi 1980 voter list
Sonia Gandhi’s book Launch : गांधी कुटुंबीयांच्या हस्ते सोनिया गांधींच्या ‘बिलॉंगिंग’ पुस्तकाचे प्रकाशन! 

सोनिया गांधी यांनी १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवले

शनिवारी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, सोनिया गांधी यांनी १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवले होते. पोलिसांनी असेही नमूद केले की, जिल्हा दंडाधिकारी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या तथ्यांची पडताळणी करण्यात आली आहे.

Sonia Gandhi 1980 voter list
Sonia Gandhi : सोनिया गांधी यांच्या जीवनावर तेलुगू चित्रपट बनणार; आत्मचरित्र ‘बिलाँगिंग’वर आधारित असेल कथा, काँग्रेस नेत्याची घोषणा

पुढील सुनावणी होणार १४ डिसेंबर रोजी

न्यायालयाने दिल्ली पोलिसांना तपास पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ दिला असून, प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. यासोबतच, न्यायालयाने तुघलक रोड पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊस ऑफिसरलाही (SHO) न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.