'सर, मैं बिक गया’! भन्नाट असं Resignation Letter व्हायरल, नेटिझन्सकडून कमेंट्चा पाऊस
Resignation Letter viral
बऱ्याचदा नोकरीचा राजीनामा देताना कर्मचारी अधिक प्रोफेशनल राहण्याचा प्रयत्न करतात. पण सोशल मीडियावर एक भन्नाट असे राजीनामा पत्र व्हायरल झाले आहे जे वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे या राजीनामा पत्रातून नोकरी सोडण्याचे प्रामाणिक कारण एका कर्मचाऱ्याने दिले आहे.
हे राजीनामा पत्र सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. जे प्रत्येकजण शेअर करत आहेत. या पत्रात, ‘हाय सर, मैं बिक गया’, ‘सामने वाली कंपनी 4 पैसे ज्यादा दे रही है’ असे लिहिले आहे. हे राजीनामा पत्र हिंग्लिशचे संस्थापक आणि सीईओ शुभम गुणे त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवर शेअर केले आहे. तसेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या पत्राला ५ लाखांहून अधिक यूजर्संनी लाईक्स केलंय. या पोस्टवर हजारो कमेंट्स पडल्या आहेत. इन्स्टाग्रामवर एका यूजरने, 'One of the best resignation ever', अशी कमेंट केली आहे.
छोट्याशा राजीनामा पत्राने नेटिझन्सचे लक्ष वेधले
या छोट्याशा राजीनामा पत्राने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. तर काही यूजर्संनी या पत्राची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी व्यवस्थापकाची यावर प्रतिक्रिया काय असेल? असे सवाल करत कल्पना केल्या आहेत. एका यूजर्सने मजेशीरपणे लिहिले आहे की, "यावर मॅनेजरचे उत्तर : 'ठीक है, उधार कोई vacancy हो तो बताना.'
ही पोस्ट, जरी एक गंमत म्हणून लिहिलेली असली तरी, भारतातील नोकरीबाबतची एक गंभीर चिंता अधोरेखित करते. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, येत्या काही वर्षात भारतातील मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या बदलण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारणे म्हणजे, चांगला पगार आणि शिकण्याच्या संधीत वाढ होणे हे आहे.
