Intelligence Bureau Recruitment 2025: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, IB मध्ये मेगाभरती; अर्ज कुठे करायचा, वयाची अट काय वाचा

IB ACIO Recruitment 2025: देशाच्या गुप्तचर यंत्रणेत सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
Intelligence Bureau Recruitment 2025: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, IB मध्ये मेगाभरती; अर्ज कुठे करायचा, वयाची अट काय वाचा
Published on
Updated on

Intelligence Bureau Recruitment 2025 How To Apply

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेसाठी काम करण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी मोठी बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB) म्हणजेच गुप्तचर विभागाने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह पदांसाठी तब्बल ३७१७ जागांची भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज, १९ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि देशाच्या गुप्तचर यंत्रणेत सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने ACIO पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवार १० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

Intelligence Bureau Recruitment 2025: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, IB मध्ये मेगाभरती; अर्ज कुठे करायचा, वयाची अट काय वाचा
Business tips: हॉटेल सुरू करताय? आधी हे वाचा; बंद पडलेल्या 'गावरान बंधू'च्या तरुण व्यावसायिकाची पोस्ट Viral

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in वर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३७१७ पदे भरली जाणार असून, आरक्षणासह पदांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

पदांचा तपशील (IB Jobs Vacancy Details)

एकूण पदे: ३७१७

सर्वसाधारण (General): १५३७ पदे

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS): ४४२ पदे

इतर मागासवर्गीय (OBC): ९४६ पदे

अनुसूचित जाती (SC): ५६६ पदे

अनुसूचित जमाती (ST): २२६ पदे

पात्रता आणि निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. सोबतच, उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे.

Intelligence Bureau Recruitment 2025: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, IB मध्ये मेगाभरती; अर्ज कुठे करायचा, वयाची अट काय वाचा
Marathi language : अभिजात मराठीच्या संवर्धनासाठी स्थापन होणार उत्कृष्टता अध्ययन केंद्र

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे.

  • वयोमर्यादेची गणना १० ऑगस्ट २०२५ या तारखेनुसार केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • ओपन (OPEN), इडब्ल्यूएस (EWS) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 650 रूपये आहे.

  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 550 रुपये असेल.

अशी असेल निवड प्रक्रिया (Selection Process)

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांतून केली जाईल.

टप्पा-१: वस्तुनिष्ठ चाचणी (Objective Test - १०० गुण)

या परीक्षेसाठी ६० मिनिटांचा वेळ दिला जाईल.

यामध्ये सामान्य जागरूकता, संख्यात्मक योग्यता, तार्किक क्षमता, इंग्रजी भाषा आणि सामान्य अध्ययन या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील.

टप्पा-२: वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Test - ५० गुण

यामध्ये निबंध लेखन (३० गुण) आणि इंग्रजी आकलन व सारांश लेखन (२० गुण) यांचा समावेश असेल.

टप्पा-३: मुलाखत (Interview - १०० गुण)

लेखी परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची व्यक्तिमत्व आणि योग्यता तपासण्यासाठी मुलाखत घेतली जाईल.

अर्ज करण्याची सोपी पद्धत (How to Apply)

  • सर्वप्रथम गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जा.

  • होम पेजवर दिसणाऱ्या भरतीच्या अर्ज लिंकवर क्लिक करा.

  • तुमची नोंदणी (Registration) पूर्ण करा.

  • नोंदणीनंतर लॉग इन करून अर्ज काळजीपूर्वक भरा.

  • सर्व माहिती तपासल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.

  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रत डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news