Supreme Court | 'त्या वेदना, अपमानाची कल्पना करा': 15 वर्षांच्या मुलीच्या गर्भपात प्रकरणी सुप्रीम कोर्टाची संवेदनशील टिप्पणी

Supreme Court |बलात्कार पीडितांसाठी गर्भपातावरील कालमर्यादा हटविण्‍याची केली केंद्र सरकारला सूचना
Supreme Court on Abortion Rights India
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

Supreme Court on Abortion Rights India

नवी दिल्ली : "बलात्‍कार पीडिता १५ वर्षाची आहे. ती अजूनही एक लहान मुलगीच आहे. या वयात तिने शाळेत जाऊन अभ्यास करायला हवा होता; पण आपण तिला आताच 'आई' बनवण्याचा विचार करत आहोत. या संपूर्ण प्रक्रियेत त्या लहान मुलीला किती वेदना आणि अपमान सहन करावा लागला असेल, याची केवळ कल्पना करा," अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि. ३०) सर्वोच्‍च न्‍यायालयाने बलात्‍कार प्रकरणांची भयावहता स्‍पष्‍ट केली. तसेच बलात्कारातील पीडितांना २० आठवड्यांनंतरही नको असलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, अशी आग्रही विनंतीही सर्वोच्‍च न्‍यायालयाने केंद्र सरकारला केली. दरम्‍यान, २४ एप्रिल रोजी, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने त्या तरुणीला ३० आठवड्यांचा गर्भ वैद्यकीयरीत्या समाप्त करण्याची परवानगी दिली होती. या निकालाविरोधात एम्‍सने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असणे आवश्यक

एका १५ वर्षीय मुलीला ३० आठवड्यांचा गर्भ वैद्यकीय पद्धतीने नष्ट करण्याची परवानगी देणारा आपलाच आदेश रद्द करण्याची मागणी करणाऱ्या 'एम्स'च्या (AIIMS) याचिकेवर सुनावणी करताना, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, जेव्हा गर्भधारणा ही बलात्काराचा परिणाम असते, तेव्हा त्यासाठी कोणतीही कालमर्यादा (वेळेची अट) नसावी. कायदा हा लवचिक (organic) आणि बदलत्या काळाशी सुसंगत असणे आवश्यक आहे," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

Supreme Court on Abortion Rights India
Supreme Court : 15 वर्षीय मुलीला 31 आठवड्यांचा गर्भपात करण्याची परवानगी, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

... तर पीडितेच्‍या मनावर आयुष्‍यभर न पुसली जाणार जखम

खंडपीठाने नमूद केले की, संबंधित गर्भपाताची परवानगी दिली नाही, तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि मानसिक आघात राहील.पीडित मातेला कोणताही कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व येत नसेल, तर गर्भपाताची प्रक्रिया पार पाडली जावी, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

Supreme Court on Abortion Rights India
Guardianship | धर्माच्‍या विचारापेक्षा बालकाचे कल्याण महत्त्वाचे! हायकोर्टाने मुस्लीम मुलीचे पालकत्व सोपवले हिंदू दांपत्याकडे

अंतिम निर्णय हा प्रत्यक्ष पीडितेचाच असणे आवश्यक

खंडपीठाने 'एम्स'ला या मुद्द्यावर पीडितेच्या पालकांचे समुपदेशन करण्यासही सांगितले. तसेच स्पष्ट केले की, या संदर्भातील अंतिम निर्णय हा प्रत्यक्ष पीडितेचाच असणे आवश्यक आहे.

Supreme Court on Abortion Rights India
SC on Mamata Banerjee | 'लोकशाही धोक्यात येईल ..." : ममता बॅनर्जींवर ताशेरे ओढताना सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्‍हणाले?

कल्‍पना करा लहान मुलीला किती वेदना सहन कराव्‍या लागल्‍या असतील

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, हे प्रकरण एका १५ वर्षीय मुलीच्या नको असलेल्या गर्भधारणेचे आहे. ही एक 'उपचारात्मक याचिका' आहे. नको असलेली गर्भधारणा कोणावरही बळजबरीने लादली जाऊ शकत नाही. कल्पना करा, ती अजूनही एक लहान मुलगीच आहे. या वयात तिने शाळेत जाऊन अभ्यास करायला हवा होता. पण आपण तिला आताच 'आई' बनवण्याचा विचार करत आहोत. या संपूर्ण प्रक्रियेत त्या लहान मुलीला किती वेदना आणि अपमान सहन करावा लागला असेल, याची केवळ कल्पना करा," असे आवाहनही खंडपीठाने केला.

Supreme Court on Abortion Rights India
Arvind Kejriwal | अरविंद केजरीवालांनी ऐकला 'अंतरात्म्याचा' आवाज; म्हणाले, "यापुढे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मांसमोर..."

या टप्प्यावर गर्भपात करणे शक्य नाही : सॉलिसिटर जनरल

'एम्स'च्या वतीने बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी या उपचारात्मक याचिकेचा संदर्भ देत असे नमूद केले की, या टप्प्यावर गर्भपात करणे आता शक्य नाही. जन्मणारे बाळ हे जिवंत असेल, परंतु त्याला गंभीर शारीरिक व्यंग (विकृती) असण्याची शक्यता आहे. अल्पवयीन असलेल्या या मातेला आयुष्यभर आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागेल आणि कदाचित भविष्यात तिला पुन्हा गर्भधारणा करणेही शक्य होणार नाही. या बाळाला दत्तक देण्यासाठी दिले जाऊ शकते. आता गर्भधारणेला ३० आठवडे पूर्ण झाले आहेत."

Supreme Court on Abortion Rights India
SUPREME COURT : "सुप्रीम कोर्टात तुमची एंट्रीच बंद करू..." : सरन्यायाधीश सूर्यकांत याचिकाकर्त्यावर का भडकले?

निर्णय विचारपूर्वक घेण्यास 'एम्स' (AIIMS) मदत करू शकते

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, गर्भसमाप्तीबाबतचा निर्णय हा पीडितेचा आणि तिच्या पालकांचाच असावा; तसेच, त्यांना हा निर्णय विचारपूर्वक घेण्यास 'एम्स' (AIIMS) मदत करू शकते. २४ एप्रिल रोजी, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने त्या तरुणीला ३० आठवड्यांचा गर्भ वैद्यकीयरीत्या समाप्त करण्याची परवानगी दिली होती. या निकालाविरोधात एम्‍सने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news