राष्ट्रीय
SBIने कर्जावरील व्याजदर वाढवले; EMI किती वाढणार, जाणून घ्या
पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टेट बँक ऑफ इंडियाने Marginal Cost of Fund Based Lending Rate (MCLR) मध्ये १० बेसिक पॉईंटची वाढ केलेली आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) कर्जावरील व्याजदर वाढलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर स्थिर ठेवल्यानंतरही SBIने मात्र व्याजदरा वाढ केलेली आहे. SBI भारतातील सर्वांत मोठी बँक असल्याने इतर बँकाही कर्जावरील व्याजदर वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अधिक वाचा –
SBIचा एक वर्षांचा MCLR हा ८.६५ टक्के होता, तो आता ८.७५ टक्के इतका करण्यात आला आहे. तर तीन महिन्यांचा MCLR ८.२ टक्केंवरून ८.३ टक्के इतका झाला आहे. तर दोन वर्षांचा MCLR 8.85 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 8.95 टक्के इतका करण्यात आलेला आहे.
अधिक वाचा –
MCLR ही SBIची व्याज ठरवण्याची पद्धत आहे, बँक या MCLRपेक्षा खालील दराने कर्ज देऊ शकत नाही. SBIच्या या निर्णयामुळे बँकेच्या सर्वच कर्जांचे व्याजदर शुक्रवारपासून वाढलेले आहेत.