Salman Khan Comment On Baluchistan : सलमान खाननं कंडकाच पाडला...? बलुचिस्तान, अफगाणिस्तान अन्... बरंच काही बोलला

सलमाननं थेट जिओ पॉलिटिक्सलाच हात घालत एक मोठा धमाका केला आहे.
Salman Khan
salman khan file photo
Published on
Updated on

Salman Khan Comment On Balochistan :

भारताचा सुपरस्टार सलमान खानच्या वक्तव्याची कायम चर्चा होत असते. तसंही सलमान खान जरी अनेक राजकारण्यांच्या कार्यक्रमात दिसत असला तरी तो राजकीय वक्तव्य करण्याचं टाळतो. मात्र यावेळी सलमाननं थेट जिओ पॉलिटिक्सलाच हात घालत एक मोठा धमाका केला आहे.

सलमान खानच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सलमान खान हा पाकिस्तान आणि बलुचिस्तान असा स्वतंत्र उल्लेख करताना दिसत आहे. त्याच्या या वक्तव्यामुळं एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुडलं आहे.

Salman Khan
Pakistan Afghanistan Conflict : सर्व अफगाण लोकांनी पाकिस्तान सोडावा.... ही जमीन २५ कोटी पाकिस्तान्यांची; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री बरळले

सलमान खाननं मध्यपूर्व आशियात काम करणाऱ्या समाजांबद्दल वक्तव्य करताना पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला. त्यानं हे वक्तव्य सौदी अरेबियाच्या रियाध इथं जॉय फोरम २०२५ या कार्यक्रमात केलं. या कार्यक्रमात बॉलीवूडचे शाहरूख खान अन् आमिर खानयांच्यासोबतच अनेक कलाकार देखील उपस्थित होते.

बलुचिस्तानचा इतिहास हा नेहमीच संघर्षमय राहिला आहे. तेथील सशस्त्र बंडखोर गटांनी बलुचिस्तानवर पाकिस्ताननं आक्रमण केलं असून बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा आहे असा दावा केलाय.

सलमान खान व्हिडिओत म्हणतो, 'सध्याच्या घडीला तुम्ही हिंदी चित्रपट सैदी अरेबियात रिलीज केला तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम चित्रपट रिलीज केला तर तो इथं शंभर कोटींचा गल्ला कमवेल. इथं इतर देशातून अनेक लोकं आलेली आहेत. इथं बलुचिस्तानमधील लोकं आहे. अफगाणिस्तानमधील लोकं आहेत. इथं पाकिस्तानमधून लोकं आलेली आहे. सर्वजण इथं काम करतात.'

Salman Khan
'ना चांगला डान्स, ना ॲक्‍टिंग तरीही शाहरूख सुपरस्‍टार कसा बनला' जॉनी लिवरने सांगितलं सिक्रेट

सलमान खानच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेक जण सलमान खाननं हे मुद्दाम केलं की त्याच्या तोंडातून ते असंच निघून गेलं याच्यावर चर्चा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news