'ना चांगला डान्स, ना ॲक्‍टिंग तरीही शाहरूख सुपरस्‍टार कसा बनला' जॉनी लिवरने सांगितलं सिक्रेट

जॉनी लिव्हरने करण-अर्जुन वेळचा सांगितला किस्‍सा
shahrukh khan 59th birthday special johny lever revealed secret of superstardom of king khan how he became so popular
'ना चांगला डान्स, ना ॲक्‍टिंग तरीही शाहरूख सुपरस्‍टार कसा बनला' जॉनी लिवरने सांगितलं सिक्रेटFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

बॉलिवूड सुपरस्‍टार शाहरूख खान आज (शनिवार) ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरूख खानला बॉलिवूडमधील कलाकारांसह जगभरातून चाहत्‍यांनी त्‍याला शुभेच्छा दिल्‍या. सोशल मीडियावरही शाहरूख खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्‍यांनी त्‍याच्या चित्रपटांच्या आठवणी शेअर केल्‍या आहेत. १११ हून अधिक चित्रपटात काम केलेल्‍या शाहरूख खानचा समावेश आज जगातील मोठ्या सिनेकलाकारांमधील एक आहे. मात्र शाहरूख खानसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कधीकाळी त्‍याला त्‍याच्या कामासाठी खूप मेहनत करावी लागत होती. (shahrukh khan)

१९९५ साली शाहरूख खानच्या 'करण-अर्जुन' चित्रपटावेळी शाहरूख खानचा संघर्ष आणि त्‍याची कामाप्रतीची तळमळ अभिनेता जॉनी लीवर यांनी जवळून पाहिली होती. त्‍यामुळे ते खूप प्रभावित झाले होते. याचा खुलासा स्‍वत: जॉनी लीवर यांनी केला होता.

जॉनी लीवरने शाहरुख खानच्या यशाचे रहस्य सांगितले...

जॉनी लीवर सांगतात की, आज शाहरूख खान हे चित्रपट क्षेत्रातील सर्वात मोठे नाव आहे. मात्र शाहरूख खान यांनी या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप कष्‍ट घेतले आहेत. त्‍याचे फळ त्‍यांना मिळाले आहे. मला आठवते की, अर्जुनच्या सेटवर शाहरुख खानचा उत्साह आणि जोश मी पाहिला आहे. शाहरूख खान दिसण्यात, डान्समध्ये आणि अभिनयात सलमान खानपेक्षा कमी होते. सलमान खान मैत्रीमध्ये नेहमी त्‍यांची चेष्‍टा मस्‍करी करायचे. पण शाहरुख खान त्याच्या कामाबद्दल उत्साही आणि खूप मेहनतीही होते. हॉटेलच्या लॉबीमध्ये ते सहकारी अभिनेत्‍यांसोबत रिहर्सल करायचे. सोबतच डान्सचीही प्रॅक्‍टिस करायचे. हेच कारण आहे की, ते आज इतके मोठे स्‍टार आहेत. शाहरुख खानचा प्रवास एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा बॉलिवूडचा बादशाह झाला.

दिल्ली सोडल्यानंतर मुंबईत राज्य केले

शाहरूख खानचा जन्म दिल्‍लीत आजच्या दिवशी १९६५ रोजी झाला. शाहरूख यांनी दिल्‍लीतच आपले शिक्षण पूर्ण केले. यावेळी ते थेटरही करत होते. यानंतर त्‍यांनी मुंबईचा रस्‍ता धरला. सुरूवातील छोटा पडदा टीव्हीवर काम केले. यानंतर चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. या ठिकाणी खूप कष्‍ट घेतले आणि अनेक अडथळे पार करत बॉलिवूडमध्ये रोमान्स किंग बनले. आज शाहरूख खानची जगभरात ओळख आहे.

कोरोना काळात जेंव्हा बॉक्‍स ऑफिसवर वाईट दिवस आले होते, तेंव्हा शाहरूख खान यांनी दमदार आगमण करत २ सुपरहिट चित्रपट देत आपले स्‍टारडम सिद्ध केले होते. आपण जर जुण्या सुपरहिट ५ चित्रपटांचा विचार केला तर त्‍यातील २ चित्रपट हे शाहरूख खान यांचेच असतील. शाहरूख खान आज बॉलिवूडचे सर्वात मोठे अभिनेते बनले आहेत. शाहरूख खानच्या वाढदिवसानिमित्‍त जगभरातून त्‍यांच्या चाहत्‍यांनी सोशल मीडियातून त्‍यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news