Rohit Sharma: रोहित शर्माला टी २० संघात परतायचंय; अय्यर की गिल निवड करताना हिटमॅनने कोणती हिंट दिली?

रोहितने आपल्या विनोदी वृत्तीने उत्तर देत आपली मनिषा स्पष्ट केली.
Rohit Sharma
Rohit Sharmapudhari
Published on: 
Updated on: 

Rohit Sharma 2027 ODI WC: रोहित शर्मा २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळू इच्छितो हे जगजाहीर आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची आयसीसी स्पर्धा असणार आहे. त्यामुळं तो मैदानावर चांगलाच घाम गाळत आहे. मात्र रोहित शर्मा आगामी वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबत सतत सभ्रम निर्माण होत आहे. त्यावर आता रोहितने आपल्या विनोदी वृत्तीने उत्तर देत आपली मनिषा स्पष्ट केली.

Rohit Sharma
Rohit Sharma Century : १६ चेंडूत ७६ धावांची आतषबाजी... रोहित शर्माचे ५२वे आंतरराष्ट्रीय शतक! हिटमॅनचा गुवाहाटीत धुमधडाका

रोहितची विनोदबुद्धी

रोहित शर्माने विनोदाने जर मला २०२७ वनडे वर्ल्डकप खेळायचा असेल तर मला कर्णधार शुभमन गिलला खुश ठेवावं लागेल असे वक्तव्य केलं. शुभमन गिल हा भारतीय वनडे संघाचा कर्णधार आहे. तर श्रेयस अय्यर हा टी २० संघाचा कर्णधार आहे. रोहितला एका कार्यक्रमादरम्यान शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांमधील एकाची निवड करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी त्याने ही विनोदी कमेंट केली.

Rohit Sharma
Rohit Sharma Record : ‘हिटमॅन’ रोहितचा महाधमाका, ‘द्विशतक’ ठोकून रचला विश्वविक्रम! १२ हजार धावांचा टप्पाही पार

गिल अन् अय्यर कोणाला निवडणार हिटमॅन?

फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा या शो वेळी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माला अनेक रंजक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याला तुम्हाला एक इमर्जन्सी कॉल करायचा आहे. तुम्ही कॉल करायला श्रेयस अय्यरची की शुभमन गिलची कोणाची निवड करणार.

या प्रश्नावर हजरजबाबी रोहित शर्माने चेष्टेत उत्तर दिलं की, 'दोघेही सध्या भारतीय संघाचे कर्णधार आहेत. गिल सध्या माझा कर्णधार आहे. मला २०२७ चा वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळं मला त्याला खुश ठेवावं लागणार आहे. २०२७ च्या वर्ल्डकप नंतर जर मला टी २० क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचं असेल तर मला श्रेयस अय्यरला खुश ठेवावं लागेल. त्यामुळं मला दोघांचीही गरज आहे.'

Rohit Sharma
Virat Kohli Video: कीर्तनात तल्लीन झाली अनुष्का शर्मा! विराट कोहलीच्या 'त्या' रिअ‍ॅक्शनमुळे चाहते थक्क, काय घडलं? पाहा व्हिडिओ

तो सध्या काय करतोय?

वेस्ट इंडीज विरूद्धच्या ३ सामन्यांची वनडे मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत रोहित शर्माने २२५ धावा करत आपला फॉर्म सिद्ध करून दाखवला आहे. तो या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिला होता.

आता तो न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेती वाट पाहत आहे. भारताच्या न्यूझीलंडविरूद्धच्या दौऱ्याची सुरूवात ही टी २० मालिकेने झाली आहे. भारतीय संघ ५ टी २० सामने खेळल्यानंतर ५ वनडे सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा ही भारताची अनुभवी जोडी काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मालिकेत देखील या जोडगोळीची कामगिरी चांगली असेल अशी आशा चाहत्यांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news