Virat Kohli Video: कीर्तनात तल्लीन झाली अनुष्का शर्मा! विराट कोहलीच्या 'त्या' रिअ‍ॅक्शनमुळे चाहते थक्क, काय घडलं? पाहा व्हिडिओ

Virat Kohli Anushka Sharma Kirtan Video Goes Viral: मुंबईतील प्रसिद्ध भक्तिगायक कृष्णा दास यांच्या कीर्तनात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सहभागी झाले होते.
Virat Kohli Anushka Sharma Kirtan
Virat Kohli Anushka Sharma KirtanPudhari
Published on: 
Updated on: 

Virat Kohli Anushka Sharma Kirtan Video Goes Viral: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांचा एक वेगळाच अंदाज सध्या चर्चेत आहे. हे दोघे मुंबईतील एका किर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रसिद्ध भक्तिगायक कृष्णा दास यांच्या कॉन्सर्टमध्ये अनुष्का आणि विराट भजनाचा आनंद घेताना दिसले. या कार्यक्रमातील त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनुष्का शर्मा भजनाच्या तालावर टाळ्या वाजवत ‘राधे गोविंदा’चा जप करताना दिसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. दुसरीकडे, विराट कोहलीही शांतपणे बसून भजनाचा आनंद घेताना दिसला. विराटने यावेळी काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता, तर अनुष्का गडद जांभळट रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसली.

अनुष्काच्या साध्या लूकचीही चर्चा

या कार्यक्रमात अनुष्का शर्माने अतिशय साधा आणि सुंदर पोशाख घातला होता. तिने गडद मलबरी रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. या सूटवर जास्त नक्षीकाम किंवा वेगळ्या प्रकारची सजावट नव्हती. साधेपणातही तिचा लूक आकर्षक दिसत होता.

भक्तिसंगीताच्या कार्यक्रमासाठी अनुष्काने निवडलेल्या या साध्या पोशाखाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असणारी अनुष्का यावेळी मात्र तिच्या साधेपणामुळे आणि भक्तिभावामुळे चर्चेत आहे.

विराटच्या भक्तिभावावर सोशल मीडियावर चर्चा

या कार्यक्रमातील अनुष्का आणि विराटचे व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण त्यांच्या भक्तिमय अंदाजाचे कौतुक करत आहेत, तर काही जण विराटच्या वागण्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.

Virat Kohli Anushka Sharma Kirtan
Pune Crime News: पुण्यात भररस्त्यात तरुणीला उचलण्याचा प्रयत्न; नराधमाने नको त्या ठिकाणी स्पर्श केला, मैत्रीण मदतीला धावली अन्...

‘Mukku’ (@Cric_Mukku) या एक्सवरील खात्यावरून विराटच्या देहबोलीबद्दल एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये इतर लोक भजनाच्या तालात रमलेले असताना विराट मात्र तुलनेने शांत दिसत असल्याचे म्हटले आहे.

पोस्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, अनुष्काशी लग्न झाल्यानंतर विराटच्या आयुष्यात आध्यात्मिकतेला अधिक महत्त्व मिळाले आणि यामागे अनुष्काचा मोठा वाटा आहे. विराट हा आपल्या पत्नीसाठी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहत असावा, असे मतही या पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

Virat Kohli Anushka Sharma Kirtan
IND vs NZ T20 मालिकेदरम्यान समोर आली वाईट बातमी! स्टार वेगवान गोलंदाज पुढील ३ सामन्यांमधून बाहेर, संघात मोठे बदल

अनुष्का-विराटच्या व्हिडीओची चाहत्यांमध्ये चर्चा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांचे लक्ष असते. यावेळी त्यांच्या महागड्या कपड्यांची किंवा आलिशान जीवनशैलीची नव्हे, तर भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातील उपस्थितीची चर्चा होत आहे.

अनुष्का भजनात टाळ्या वाजवत सहभागी होताना दिसली, तर विराट तिच्या शेजारी बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होता. या व्हिडीओमुळे दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि आध्यात्मिकतेबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news