Republic Day 2026: कर्तव्य पथावर शक्तिप्रदर्शनाचा ‘पॉवर शो’! पुष्पवृष्टी, मिसाईल्स आणि टँकांची थरारक झलक

Republic Day 2026: देशाने आज 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ध्वजारोहण केले आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली. कर्तव्य पथावर Mi-17 हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
Republic Day 2026
Republic Day 2026Pudhari
Published on
Updated on

Republic Day 2026 Parade: देशभरात आज 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. यावेळी राष्ट्रगीत झाले आणि परंपरेनुसार 21 तोफांची सलामी देण्यात आली.

कर्तव्य पथावर सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान भारतीय हवाई दलाच्या Mi-17 1V हेलिकॉप्टरच्या फॉर्मेशनमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 129 हेलिकॉप्टर युनिटच्या 4 Mi-17 हेलिकॉप्टरने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत हवेतून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. या हेलिकॉप्टर फॉर्मेशनचं नेतृत्व ग्रुप कॅप्टन आलोक अहलावत यांनी केलं.

युरोपियन संघाचे प्रमुख पाहुणे, उर्सुला यांची पोस्ट चर्चेत

यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडला युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, “प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. भारत हा जगाला अधिक स्थिर, समृद्ध आणि सुरक्षित बनवत आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’चा झेंडा

कर्तव्य पथावर यावेळी स्वदेशी बनावटीच्या ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरचं खास प्रदर्शनही करण्यात आलं. हे हेलिकॉप्टर लांब पल्ल्याचे रडार आणि दिवस-रात्र काम करणाऱ्या कॅमेऱ्यांनी सज्ज आहेत. विशेष म्हणजे या हेलिकॉप्टरवर ‘ऑपरेशन सिंदूर’चा ध्वज लावण्यात आला होता.

Republic Day 2026
Zero Civic Sense: सोशल मीडियावर 'झिरो सिव्हिक सेन्स' का होतोय ड्रेंड? एका व्हिडिओने घातलाय धुमाकूळ

मिसाईल्सचा ‘पॉवर शो’

यंदाच्या परेडमध्ये भारताने आपल्या स्वदेशी संरक्षण क्षमतेवर भर देत सूर्यस्त्र आणि ब्रह्मोस या दोन महत्त्वाच्या क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन केलं. सूर्यस्त्र हे शत्रूच्या रडार प्रणाली शोधून त्यांना निष्क्रिय करण्यासाठी उपयुक्त मानलं जात असून त्यातून भारताची इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमता आणि हवाई संरक्षण अधिक मजबूत होत असल्याचा संदेश देण्यात आला.

Republic Day 2026
Republic Day: प्रजासत्ताक दिनाआधी मोठा कट उधळला! 10 हजार किलो स्फोटके जप्त, कुठे आणि कशी सापडली?

परेडचं नेतृत्व लेफ्टिनेंट जनरल अवनीश कुमार यांनी केलं

कर्तव्य पथावरील या औपचारिक परेडचं नेतृत्व परेड कमांडर लेफ्टिनेंट जनरल अवनीश कुमार यांनी केलं. सजवलेल्या वाहनातून त्यांनी संचालन करत परेड अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली. देश-विदेशातील मान्यवर पाहुणे आणि हजारो नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news