

Reliance Venezuelan crude Oil: भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने अमेरिकेकडे व्हेनेजुएलामधील कच्च तेल खरेदी करण्याची परवानगी मागितली आहे. रिलायन्स तेल खरेदीबाबतची वेगळी शक्यता चाचपून पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. रिलायन्स आपल्या क्रुड ऑईल रिफायनरीचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. हे वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी दबाव टाकला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी ये युएस स्टेट आणि ट्रेजरी विभागासोबत चर्चा करत आहे. ते व्हेनेजुएलामधून तेल खरेदी करण्याची परवानगी मागत आहेत. अमेरिकेने व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर वॉशिंग्टन आणि काराकस यांच्यात ५० मिलियन बॅरल तेल शिप करण्यावरून वाटाघाटी सुरू आहेत.
दरम्यान, रॉयटर्सने याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीला मिळालेल्या माहितीवर त्यांची प्रतिक्रिया मिळावी म्हणून मेल केला आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजने अजून त्या मेलला उत्तर दिलेलं नाही. भारताची ही सर्वात मोठी ऑईल रिफायनरी कंपनी रिलायन्सने गेल्या वर्षी देखील युएस सँक्शन व्हेनेजुएलामधून तेल आयात करण्याचे लायसन मिळवले होते.
व्हेनेजुएलाची तेल कंपनी PDVSA यांनी रिलायन्सला ४ क्रूड कार्गो तेल पुरवाठा केला होता. PDVSA च्या अंतर्गत रेकॉर्डनुसार २०२५ च्या पहिल्या चार महिन्यात जवळपास ६३ हजार बॅरल प्रती दिन पुरवठा केला जात होता. त्यानंतर अमेरिकेने मार्च आणि एप्रिल महिन्यात PDVSA च्या अनेक बिजनेस पार्टनर्सचे लायसन्स सस्पेंड केलं होतं. याद्वारे मादुरो यांच्यावर दबाव निर्माण केला जात होता.
रिलायन्सने गुरूवारी स्पष्ट केलं होतं की जर युएस बायर्स युएसच्या नियमांनुसार परवानगी देणार असतील तर रिलायन्स व्हेनेजुएलाचं तेल खरेदी करण्यात रस दाखवेल.
दरम्यान, युएस ट्रेजरी विभागाच्या प्रवक्त्यांनी आमचा विभाग हा कोणत्याही लायसन्स किंवा ते मिळवण्यासाठीच्या विनंतीवर कमेंट करू शकत नाही. त्यांचा विभाग डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना पूर्णपणे समर्थन देत असल्याचे देखील स्पष्ट केलं.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये टॉपच्या तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. व्हेनेजुएलाच्या समुद्र किनाऱ्यावर लाखो बॅरल क्रूड ऑईल हे टँक अन् व्हेसनलमध्ये अडकून पडलं आहे. अनेक तेल कंपन्या व्हेनेजुएलातून तेल निर्यात करण्यासाठी लायसन्स मिळावं म्हणून प्रयत्नशील आहेत.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते व्हेनेजुएलाची तेल निर्यात अनिश्चित काळासाठी नियंत्रणात ठेवत आहेत. यातील काही टक्के तेल हे दुसऱ्या देशातील खरेदीदारांसाठी देखील असेल अशी शक्यता आहे. ट्रम्प यांनी चीन हा व्हेनेजुएलामधून सर्वाधिक तेल खरेदी करत होता. आता रिलायन्स व्हेनेजुएलाचं तेल अमेरिकेकडून खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे.
जर योग्य दरात हे तेल मिळालं तर कंपनी व्हेनेजुएलात ड्रिलिंग हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. जर असं झालं तर व्हेनेजुएलाचं तेल हे रशियन सप्लायर्सची रिप्लेसमेंट म्हणून भारतासाठी मदतीचं ठरू शकले.
रिलायन्स कंपनी ही रशियन तेल खरेदी करणारा सर्वात मोठा भारतीय खरेदीदार आहे. मात्र त्यांनी अनेक महिन्यांपासून रशियाकडून कार्गो मिळालं नसल्याचा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी करू नये म्हणून दबाव टाकायला सुरूवात केल्यापासून रशियाकडून तेल मिळालं नसल्याचं सांगितलं आहे.