RBI: बँकांची मनमानी चालणार नाही, आरबीआयचा कडक आदेश; तुमचा EMI होणार कमी

RBI Repo Rate EMI: आरबीआयने काही दिवसांपूर्वीच रेपो रेटमध्ये 0.25% कपात केली आहे, ज्याचा थेट परिणाम कर्जाच्या ईएमआयवर पडणार आहे.
RBI Repo Rate EMI
RBI Repo Rate EMIfile photo
Published on
Updated on

RBI Repo Rate EMI

नवी दिल्ली : आरबीआयने काही दिवसांपूर्वीच रेपो रेटमध्ये 0.25% कपात केली आहे, ज्याचा थेट परिणाम कर्जाच्या ईएमआयवर पडणार आहे. तरीही, या कपातीचा फायदा काही बँका ग्राहकांपर्यंत पोहोचवत नव्हते. त्यामुळे, मंगळवारी आरबीआयने देशभरातील सर्व बँकांना आदेश दिला की त्यांनी रेपो रेट कपातीचा फायदा लोकांना त्वरित द्यावा. आरबीआयच्या या आदेशानंतर, एचडीएफसी, पीएनबी, ॲक्सिस बँक सह अनेक बँकांनी कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

RBI Repo Rate EMI
अर्थवार्ता | व्याजदर वाढण्याची शक्यता कमी : RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा

देशातील मोठ्या ५ बँकांचे व्याजदर (केलेली कपात)

  • एचडीएफसी बैंक- 8.30% (0.05%)

  • पंजाब नॅशनल बँक- ८.१०% (०.२५%)

  • बँक ऑफ इंडिया - ७.९०% (०.२५%)

  • इंडियन बँक- ७.९५% (०.२५%)

  • अ‍ॅक्सिस बँक- ८.१०% (०.२०%)

  • बँक ऑफ बडोदा- ७.१०% (०.२५%)

व्याजदर कपातीनंतर, सर्व बँकांसाठी सुरुवातीचे व्याजदर आता ७.१०% ते ८.१०% दरम्यान आहेत.

वर्षभरात रेपो दर किती कमी झाला आहे?

२०२५ हे वर्ष संपणार आहे. आरबीआयने वर्षभरात अनेक वेळा रेपो दरात कपात केली आहे. यामुळे २०२५ च्या सुरुवातीपासून एकूण १.२५% ची कपात झाली आहे. या कपातीनंतर, रेपो दर आता ५.२५% पर्यंत पोहोचला आहे.

ईएमआय मध्ये किती घट झाली?

समजा, तुमचे 40 लाख रुपयांचे गृहकर्ज आहे. त्यानुसार, तुमच्या ईएमआयमध्ये किती घट झाली आहे, ते खालीलप्रमाणे समजून घेऊया :

  • आधी: व्याजदर ८.१५%, दरमहा ईएमआय ३३,८३२, एकूण भरावी लागणारी रक्कम८१,१९,६७५

  • आता: व्याजदर ७.९०%, दरमहा ईएमआय ३३,२०९, एकूण भरावी लागणारी रक्कम ७९,७०,१८२

RBI Repo Rate EMI
Home Loan: गृह कर्ज लवकर फेडण्याच्या ५ टीप्स... आता EMI चं टेन्शन विसरा

रेपो दर कमी झाल्यावर तुमचे गृहकर्ज कसे कमी करावे?

  • जर तुमचे कर्ज फ्लोटिंग रेटवर असेल, तर बँकेला नवीन रेपो दरानुसार व्याजदर कमी करण्यास लेखी विनंती करा. यामुळे तुमचा ईएमआय लगेच कमी होऊ शकतो.

  • जर तुमची बँक दर कमी करत नसेल, तर कर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करा. नवीन बँकेत कमी व्याजदरामुळे थेट ईएमआय बचत होईल.

  • कर्जाचा एक भाग अतिरिक्त निधीतून (बोनस, बचत) भरा. यामुळे व्याजाचा भार कमी होईल आणि कर्जाची परतफेड जलद होईल.

  • तुमचे कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड रेट (EBLR)शी जोडलेले असल्याची खात्री करा. आरबीआयच्या रेपो दर कपातीचा थेट फायदा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news