अर्थवार्ता | व्याजदर वाढण्याची शक्यता कमी : RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा

RBI economic news
अर्थवार्ता | व्याजदर वाढण्याची शक्यता कमी : RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा Pudhari Photo
Published on
Updated on

प्रीतम मांडके

* रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात वाढ दिसून आली असून, निफ्टी निर्देशांकाने 152.70 अंशांची वाढ नोंदवत 26,186 अंकांवर बंद दिला. दिवसभरात निफ्टीने 26,202 चा उच्चांक आणि 25,985 चा नीचांक स्पर्श केला. सेन्सेक्समध्येही सकारात्मक वातावरण राहिले असून, निर्देशांक 447 अंशांनी वाढून 85,186 अंकांवर स्थिरावला. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्सने 85796 चा उच्चांक आणि 85078 चा नीचांक नोंदवला.

* रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 25 बेसिस पॉईंटने कपात करून अर्थव्यवस्थेसाठी तरलतेचा (liquidity) मोठा पुरवठा जाहीर केला असून, सुमारे रु. 1.45 लाख कोटी बाजारात सोडले जाणार आहेत. यामुळे रेपो रेट 5.25 टक्क्यांपर्यंत खाली आला. आर्थिक वर्ष 2025-2026 साठी GDP वाढीचा अंदाज 7.3% पर्यंत वाढवण्यात आला तर महागाईचा अंदाज 2% पर्यंत कमी करण्यात आला आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, पुढील काळात व्याजदर वाढण्याची शक्यता कमी आहे आणि दर स्थिर राहण्याची दाट शक्यता आहे.

सध्याच्या कमी महागाईच्या वातावरणात आर्थिक वाढ टिकवण्यासाठी सुलभ चलनविषयक धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. ठइख च्या मते, रुपयात 5% अवमूल्यन झाल्यास महागाईवर साधारण 35 बेसिस पॉईंटस्ची वाढ होते. बाजारातील अनिश्चितता दूर करण्यासाठी चलन पुरवठा आणि धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. ग्लोबल आर्थिक मंदी आणि कच्च्या मालाच्या किमतीवरील दबाव लक्षात घेऊन ठइख ने ‘गोल्डीलॉक्स’ म्हणजे मध्यम महागाई आणि स्थिर वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. या निर्णयामुळे कर्जदरात आणखी कपातीची शक्यता निर्माण झाली असून, उद्योग क्षेत्र आणि कर्जदारांना दिलासा मिळू शकतो.

* नेटफ्लिक्सने तब्बल 72 अब्ज डॉलर्सचा करार करत वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी खरेदी करण्याचे ठरवले आहे. या करारानुसार वॉर्नर ब्रदर्सचे शेअरधारक प्रति शेअर 27.75 डॉलर्स किमतीचे कॅश आणि नेटफ्लिक्सचे शेअर्स मिळवणार आहेत. कराराची एकूण किंमत 72 अब्ज डॉलर्स असली तरी एंटरप्राईज व्हॅल्यू सुमारे 82.7 अब्ज डॉलर्सपर्यंत जाते. व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी CNN, TBS आणि TNT यांसारख्या महत्त्वाच्या केबल चॅनेल्सचे विभाजन करण्यात येणार आहे. हा अधिग्रहण करार नेटफ्लिक्ससाठी ऐतिहासिक ठरणार असून, स्ट्रीमिंग मार्केटमध्ये त्याची पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. वॉर्नर ब्रदर्सच्या मालकीतील कइज नेटवर्क आणि लोकप्रिय मालिका, चित्रपट यांची समृद्ध लायब्ररी आता नेटफ्लिक्सच्या छत्राखाली येणार आहे. या व्यवहारामुळे हॉलीवूडमधील मीडिया स्पर्धेचे स्वरूप बदलू शकते.

* केंद्र सरकार आयडीबीआय बँकेतील आपला 7.1 अब्ज डॉलर्सचा हिस्सा विक्रीसाठी या महिन्यात बोली मागवण्याची शक्यता आहे. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या खासगीकरण प्रक्रियेत हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. संभाव्य खरेदीदारांसोबतच्या चर्चेला वेग आला असून, विक्री टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या महिन्यातच स्पर्धात्मक बोली प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होऊ शकते. गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठी सरकारी बँक हिस्साविक्री म्हणून हा व्यवहार ओळखला जाईल, अशी अपेक्षा आहे. विक्री प्रक्रियेमुळे आयडीबीआय बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास आणि केंद्राच्या विनिवेश धोरणाला गती मिळण्यास मदत होऊ शकते.

* सेबीने वित्तीय इन्फ्लुएंसर अवधूत साठे आणि त्यांच्या पत्नी गौरी साठे यांना सिक्युरिटीज बाजारात प्रवेश करण्यास बंदी घालून रु. 546 कोटींची रक्कम जप्त केली आहे. साठे यांच्या अडढअझङ या ट्रेडिंग अ‍ॅकॅडमीने नोंदणी नसताना गुंतवणूक सल्ला दिल्याचे सेबीचा आरोप आहे. प्राथमिक तपासानुसार, या प्लॅटफॉर्मने सुमारे चार लाख सहभागींकडून मोठ्या प्रमाणात फी गोळा केली असण्याचा अंदाज आहे. सेबीने संबंधित रक्कम स्थिर ठेवींमध्ये ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील आदेशापर्यंत प्रशिक्षण आणि सल्ला सेवा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अनियमित गुंतवणूक सल्ल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले असल्याचा आरोप आहे.

* गतसप्ताहात रुपया चलनाच्या इतिहासात रुपयाने प्रथमच 90 रुपये प्रति डॉलरची परिसीमा गाठली. डॉलरच्या तुलनेत रुपया 90.42 पर्यंत घसरल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे किंचित सुधारणा झाली. रुपयातील ही तीव्र घसरण परकीय गुंतवणूकदारांना भारतीय इक्विटी मार्केटमध्ये परत आकर्षित करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. विश्लेषकांच्या मते, सध्याचा विनिमय दर ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी असून रुपया मोठ्या प्रमाणात ‘अंडरव्हॅल्यूड’ आहे. कमजोर रुपयामुळे बँका, आयातदार आणि वस्तू बाजारांवर दबाव निर्माण झाला असला तरी निर्यात क्षेत्राला अल्पकालीन फायदा होऊ शकतो.

शुक्रवारअखेर रिझर्व्ह बँकेने 25 बेसिस पॉईंटने दरकपात आणि रु. 1 लाख कोटींच्या तरलता उपाययोजना जाहीर केल्या असतानाही रुपया डॉलरच्या तुलनेत 89.98 या पातळीवर कमजोर बंद झाला. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांचे सातत्याने बाहेर जाणे, भारत-अमेरिका व्यापार चर्चेत स्थिरावलेली प्रगती आणि सोन्याच्या किमतीतील वाढ यामुळे रुपयावर दबाव टिकून आहे. दिवसात रुपया काही वेळ 90 च्या वर गेला होता; मात्र बाजार शेवटच्या सत्रात स्थिरावत बंद झाला.

* रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत दौर्‍यातून; भारत हा पाश्चिमात्य देशांच्या विशेषतः अमेरिकेच्या दबावाला झुकणार नसल्याचे स्पष्ट झाले. नोव्हेंबर महिन्यात भारताचे रशियाकडून कच्चे तेल आयात पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचून दररोज 1.8 दशलक्ष बॅरल्स झाली. एकूण कच्चे तेल आयातीत रशियाचा हिस्सा 35% पेक्षा अधिक राहिला आहे. अमेरिकन निर्बंध लागू होण्यापूर्वी रशियन मालवाहूंच्या मोठ्या प्रमाणातील आगमनामुळे आयात वाढल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते डिसेंबरमध्ये आयात काहीशी कमी होण्याची शक्यता असली तरी रशियाकडील दर आणि पुरवठा भारतासाठी अद्यापही आकर्षक ठरत आहेत.

भारत-रशिया व्यापारात पुढील काही महिन्यांत नावीन्यपूर्ण मार्गांचा अवलंब वाढू शकतो. पुतीन यांच्या दौर्‍यामध्ये प्रामुख्याने भारत आणि रशिया यांच्यामधली व्यापार तूट कमी करण्याच्या द़ृष्टीने पावले उचलली गेली. रशियाकडून खनिज तेल आयात केले जाते तर भारताकडून औषधे, कृषीजन्य पदार्थ आणि मसाले यांची रशियाला निर्यात वाढवण्याला प्राधान्य दिले जाईल.

* नोव्हेंबर महिन्यात जीएसटी महसुलात मंदी दिसून आली असून, एकूण जमा 1.75 लाख कोटी झाले, जे वार्षिक तुलनेत 4% कमी आहे. सप्टेंबरमध्ये 375पेक्षा अधिक वस्तूंवरील जीएसटी दरकपातीनंतर कर संकलनावर परिणाम झाल्याचे अधिकार्‍यांचे मत आहे. आयातीतून जमा होणारा खॠडढ 10.2% वाढला असला तरी देशांतर्गत व्यवहारांवरील संकलन 2.3% नी घटले. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (खखझ) ऑक्टोबर महिन्यात 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरून केवळ 0.4% वाढ नोंदवली. उत्पादन क्षेत्रातील वाढ 1.8% वर मर्यादित राहिली तर खाण (-1.8%) आणि वीज क्षेत्रात (-6.9%) घट झाली. उत्सवी हंगामानंतर उद्योगक्षेत्रात मंदीचे संकेत दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

* आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीला रु. 10,000 कोटींच्या ‘आयपीओ’साठी सेबीची अंतिम मंजुरी मिळाली आहे. कंपनीने 8 जुलै रोजी ओएफएस पद्धतीने आयपीओ कागदपत्रे दाखल केली होती. हा इश्यू 18 इन्व्हेस्टमेंट बँका हाताळणार असून, त्यात आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सिटिग्रुप, मॉर्गन स्टॅन्ली आणि डइख कॅपिटल मार्केटस् यांचा समावेश आहे. सक्रिय म्युच्युअल फंड व्यवस्थापन अंतर्गत भांडवल मूल्याच्या बाबतीत आयसीआयसीआय प्रु एमसीचा बाजारातील हिस्सा मार्च 2025 पर्यंत 13.3% आहे आणि ती देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड घराण्यांपैकी एक आहे. कंपनीच्या गत भागीदारांनी भागभांडवल विक्रीसाठी बाजारस्थिती लक्षात घेऊन योजना आखली आहे.

* 28 नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारतातील परकीय चलनसाठ्यात सलग दुसर्‍या आठवड्यात घट नोंदली गेली असून, साठा 1.87 अब्ज अमेरिकन डॉलर्सने कमी होऊन 686.22 अब्ज डॉलर्सवर आला आहे. याआधीच्या सप्ताहात साठ्यात 4.47 अब्ज डॉलर्सची अधिक तीव्र घसरण झाली होती, तेव्हा परकीय चलनसाठा 688.10 अब्ज डॉलर्सवर होता. चालू आठवड्यातील घट मुख्यत्वे परकीय चलन मालमत्तांमध्ये झालेल्या कपातीमुळे झाली आहे, ज्यात तब्बल 3.56 अब्ज डॉलर्सची घट नोंदवली गेली. सध्या भारताची परकीय चलन मालमत्ता 557.03 अब्ज डॉलर्सवर आली असून, हा साठ्याचा सर्वात मोठा घटक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news