Anirudha Sankpal
घर खरेदी करणं हे प्रत्येक व्यक्तीचं एक मोठं स्वप्न असतं.
मात्र या स्वप्नपूर्तीसाठी काढलेलं होम लोन बऱ्याच काळाची डोकेदुखी ठरते.
१५ ते २० वर्षे या होम लोनचे EMI भरण्यातच खिसा रिकमा होतो.
मात्र आता तुम्ही या EMI च्या डोकेदुखीपासून वाचू शकता. तुम्ही काही ट्रिक वापरून कर्ज कमी वेळात फेडू शकता.
EMI वर्षाला वाढवा
तुम्ही तुमचा EMI प्रत्येक वर्षी ५ ते १० टक्क्यांनी वाढवा. हा बदल बँकेला कळवा. तुमचे उत्पन्न वाढले की तुम्ही EMI वाढवा यामुळं तुमची मुद्दल वेगानं कमी होईल अन् कर्ज फेडण्याचा अवधी कमी होईल.
१२ ऐवजी १३ EMI
तुम्ही प्रत्येक वर्षी एक जादाचा EMI भरू शकता. ही सोपी मात्र फार प्रभावी ट्रीक आहे. यामुळे तुमची मुद्दल कमी होण्यास मदत होते. बँक याला प्रीपेमेंट मानते. यासाठी बोनस किंवा टॅक्स रिफंडचा वापर केलेला उत्तम
थोडी रक्कम प्री पेमेंट करणे
जर तुम्हाला मोठी रक्कम अचानक मिळाली तर ती रक्कम तुम्ही पार्शली प्री पेमेंट म्हणून वापरू शकता. ही रक्कम बँक खात्यात जमा करा अन् मुद्दल रक्कमेतून वजा करून तुम्ही कर्जाचा अवधी कमी करून घेऊ शकता.
आधी ज्यादा व्याजदराचे कर्ज भागवा
जर तुमचे होम लोन सोबतच पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड असे काही जास्त व्याजदर असलेली कर्जे असतील तर आधी ते लोन फेडून घ्या. त्यातून EMI ची वाचणारी रक्कम आणि सेविंग असे पार्शली प्री पेमेंट करून कर्जाचा लोड कमी करू शकता.
जास्त डाऊन पेमेंट
होम लोनच्या सुरूवातीलाच जर तुम्ही जास्तीजास्त रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरली तर कर्जाच्या मूळ रक्कम कमी होते. त्यावर लागणारे व्याज देखील कमी होते. कमी मुद्दल असेल तर हफ्ता देखील कमी बसतो.