Ram Rahim: राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर; २१ दिवसांची पॅरोल मंजूर, आतापर्यंत १७ वेळा सुटका

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याची २१ दिवसांसाठी पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे.
Ram Rahim
Ram RahimFile Photo
Published on
Updated on

Ram Rahim

रोहतक : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याची २१ दिवसांसाठी पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे सुमारे ६ वाजता रोहतकमधील कडेकोट सुरक्षा असलेल्या सुनारिया तुरुंगातून तो बाहेर पडला. २०१७ मध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणांत दोषी ठरल्यानंतर त्याची तुरुंगातून झालेली ही १७वी तात्पुरती सुटका आहे.

राम रहीमला सुरक्षा व्यवस्थेत तुरुंगाबाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तो सिरसा येथील डेरा मुख्यालयाकडे रवाना झाला आहे. विशेष म्हणजे, २६ जून रोजी ३० दिवसांचा पॅरोल पूर्ण करून तो सुनारिया तुरुंगात परतला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत त्याला पुन्हा २१ दिवसांची पॅरोल मंजूर करण्यात आली आहे.

Ram Rahim
Turkey Pakistan arms supply: तुर्कस्तानची लष्करी विमाने थेट पाकिस्तानात उतरली; मोठा शस्त्रपुरवठा? भारताची चिंता वाढली

दोन महिला अनुयायांवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये राम रहीम यांना सुनारिया कारागृहात ठेवण्यात आले होते. मंगळवारच्या सुटकेनंतर राम रहीमला आतापर्यंत पॅरोल किंवा फर्लोच्या माध्यमातून १७ वेळा तुरुंगाबाहेर येण्याची परवानगी मिळाली आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वारंवार तात्पुरती सुटका मिळत असल्याने यापूर्वीही या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

याच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये राम रहीमला ४० दिवसांची पॅरोल मंजूर झाली होती. त्यानंतर मे महिन्यात त्याला ३० दिवसांची पॅरोल देण्यात आली. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो २६ जून रोजी सुनारिया तुरुंगात परतला होता.

दरम्यान, राम रहीमच्या ताज्या सुटकेचा संबंध पंजाबच्या राजकारणाशीही जोडला जात आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Ram Rahim
Census 2027: जनगणनेत पहिल्यांदाच 'भिक्षेकरी आणि भटके' यांची स्वतंत्र नोंद होणार नाही; काय आहे कारण?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news