Turkey Pakistan arms supply: तुर्कस्तानची लष्करी विमाने थेट पाकिस्तानात उतरली; मोठा शस्त्रपुरवठा? भारताची चिंता वाढली

गेल्या काही दिवसांत तुर्कस्तानच्या लष्करी मालवाहू विमानांच्या पाकिस्तानमधील फेऱ्यांमध्ये अचानक झालेली वाढ भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
Turkey military flights
Turkey military flightsFile Photo
Published on
Updated on

Turkey Pakistan military flights

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत तुर्कस्तानच्या लष्करी मालवाहू विमानांच्या पाकिस्तानमधील फेऱ्यांमध्ये अचानक झालेली वाढ भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. तुर्कस्तानकडून पाकिस्तानला अत्याधुनिक लष्करी साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात असावा, असा तीव्र संशय भारतीय संरक्षण वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

‘ओपन-सोर्स फ्लाइट ट्रॅकर्स’नुसार, १९ ते २१ ऑगस्टदरम्यान तुर्कस्तानच्या ‘C-130 हर्क्युलिस’ आणि ‘A400M’ या लष्करी मालवाहू विमानांनी पाकिस्तानच्या नूर खान, मसरूर आणि मुरीद या प्रमुख हवाई तळांवर अनेकदा लँडिंग केले. या विमानांमधून बायरक्तार आणि असिसगार्ड या सिस्टीमसह अत्याधुनिक मानवरहित ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा पाकिस्तानला पुरवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Turkey military flights
Jantar Mantar Protest | जंतर-मंतर आंदोलनामध्ये पोलिसांनी इलेक्ट्रिक शॉक उपकरणे, पेलेट गनचा अतिवापर केला, 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'चा अहवाल!

‘मक्का संरक्षण करारा’नंतरच्या घडामोडी

७ ऑगस्ट रोजी पाकिस्तान, तुर्कस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात त्रिपक्षीय 'मक्का संयुक्त संरक्षण करार' झाला. या करारानुसार, तीनपैकी एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. या सामूहिक सुरक्षा करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तुर्कीच्या विमानांची ही संशयास्पद हालचाल पाहायला मिळाली आहे. या लष्करी उड्डाणांबाबत दोन्ही देशांनी अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, पाकिस्तान भारतासोबतच्या नव्या संघर्षाची तयारी तर करत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऑपरेशन सिंदूर आणि तुर्कीची भूमिका

गेल्या वर्षी मे महिन्यात पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'पूर्वी चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला प्रगत लष्करी साहित्य पुरवले होते. यात चिनी बनावटीच्या 'PL-15' क्षेपणास्त्रांसह तुर्कीच्या ‘बायरक्तार’ आणि ‘सिसगार्ड सोंगर’ या आत्मघाती ड्रोन्सचा समावेश होता.

त्यावेळी चार दिवस चाललेल्या या संघर्षात भारतीय सैन्याने आपल्या बहुस्तरीय हवाई संरक्षण ग्रिड आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानी आक्रमणाचा कट उधळून लावत त्यांचे संरक्षण नेटवर्क पूर्णपणे उध्वस्त केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची सुरू असलेली ही लष्करी हालचाल भारतासाठी सतर्कतेचा इशारा मानली जात आहे.

Turkey military flights
Kerala Gulf Migrants : सौदीहून परतणाऱ्या केरळच्या मुस्लिमांमध्‍ये वाढतीय कट्टरता; वर्ल्ड बँकेच्या अहवालावर थरुरांची चिंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news