Ram Mandir Donation Theft Case : फॉरेन्सिक अहवालामुळे राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या अडचणीत वाढ

आरोपींचे जबाब पुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाने दिली परवानगी
Ram Mandir Donation Theft Case
File Photo
Published on
Updated on

Ram Mandir Donation Theft Case : राममंदिर देणगी चोरी प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तुरुंगात असलेल्या आठही आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आरोपींचे जबाब पुन्हा नोंदवण्यासाठी तपास अधिकारी तथा पोलीस उपअधिक्षकांनी विशेष न्यायाधीश (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा) रजत वर्मा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे.

फॉरेन्सिक तपास अहवाल पोलिसांना प्राप्‍त

तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली रोकड, नाणी, दागिने आणि इतर साहित्य फॉरेन्सिक तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या तपासाचा अहवाल आता पोलिसांना प्राप्त झाला आहे.

Ram Mandir Donation Theft Case
Women's Asia Cup 2026 : भारताने महिला आशिया चषक जिंकल्यास 'ट्रॉफी चोर' नक्वीमुळे पुन्हा रंगणार 'हायव्होल्टेज ट्रॉफी ड्रामा'?

आरोपींच्या नव्या जबाबांमुळे तपासाला नवी दिशा मिळणार

फॉरेन्सिक अहवालातील माहितीबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, हा अहवाल आरोपींविरुद्ध अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे मानले जात आहे. आरोपींच्या नव्या जबाबांमुळे तपासाला नवी दिशा मिळून आणखी नवे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.याआधीही आरोपींना न्यायालयात मोठा झटका बसला होता. चुकीच्या कलमांखाली झालेली अटक, रिमांड आणि जप्तीवर प्रश्न उपस्थित करत आरोपींनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.

Ram Mandir Donation Theft Case
Manoj Jarange Patil: '....तेव्‍हा देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता', मुंबईतील आंदोलनाबाबत जरांगे काय म्‍हणाले?

सर्व आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत

सध्या सर्व आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली आहे. तसेच सर्वांच्या जामीन अर्जांवर विशेष न्यायाधीश (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा) रजत वर्मा यांच्यासमोर सुनावणी प्रलंबित आहे.

Ram Mandir Donation Theft Case
Supreme Court : "डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मोकाट सोडू नका" : महाराष्ट्रातील घटनांबाबत सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news