Rajasthan New CM: राजस्थानमध्‍ये मुख्यमंत्रीपदासाठी खल सुरुच, आता ‘बिहार पॅटर्न’ची चर्चा

Defence Minister Rajnath Sing
Defence Minister Rajnath Sing

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्‍यांमध्‍ये भाजपने  स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यापैकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांसाठी मुख्यमंत्री निश्चित करण्यात आले आहे. मात्र राजस्थानमध्‍ये चर्चा सुरु आहे. दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्‍या भूमिकेबात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. २०२० च्या बिहार निवडणुकीत देखील केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे आता राजस्थान भाजपमध्‍ये 'बिहार पॅटर्न'ची चर्चा होत आहे. (Rajasthan New CM)

Rajasthan New CM: बिहारमध्ये काय घडलं हाेतं?

बिहार विधानसभा निवडणुकीत २०२० मध्ये, भारतीय जनता पक्ष आणि जनता दल संयुक्‍त (जेडीयू) आघाडीला बहुमत मिळाले. सत्ता मिळविलेल्या युतीमध्ये भाजप सर्वोच्च स्थानी होते. तर सर्वाधिक जागा लालूप्रसाद यादव यांच्‍या राष्ट्रीय जनता दलास मिळाल्‍या होत्‍या. अधिक जागा मिळाल्‍याने मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा, असा सूर होता; पण, नंतर प्रकरण पुढे आले की, एनडीएने नितीशकुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कायम ठेवावे. भाजपला उपमुख्यमंत्रीपद द्यावे लागले. यावेळी मुख्यमंत्री पदाच्या निर्णयासाठी राजनाथ सिंह पाटणा येथे पोहोचले.  तेव्हा काही वेळाने आतून बातमी आली की, सुशील मोदी शर्यतीतून गायब झाले आहेत.

भाजपसोबत जनादेश घेऊनही जेव्हा नितीशकुमार महाआघाडीत सामील झाले, तेव्हा सुशील मोदींच्या माघारीचा हा परिणाम आहे, अशी चर्चा रंगली हाेती. दरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्‍हा एकदा सुशील माेदी यांना पुन्‍हा उपमुख्यमंत्रीपदी  नियुक्ती केली. आता बिहारप्रमाणेच राजस्थानही केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह ठरणार किंगमेकर ठरू शकतात, असे मानले जात आहे. राजस्थानात मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. वसुंधरा राजे सिंधिया यांच्याबाबत सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. बिहारमध्ये सुशील कुमार मोदींच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. मात्र बिहारमध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यस्थी केली हाेती. यावेळी सुशील कुमार मोदी भाजपमध्ये मोदींच्या बाजूने आणि विरोधात आहेत हे गुप्त स्लिपमधून कळणार होते. यानंतर भाजप कार्यालयात बरीच धांदल उडाली होती, मात्र राजनाथ सिंह यांनी येथे स्लिप जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news