Rahul Gandhi: फक्त 'वोट चोरी' म्हणून चालणार नाही... राहुल गांधी म्हणतात आम्ही एक 'मेथर्ड' तयार करणार आहे

राहुल गांधी यांनी बर्लीनमधील हेरटाय स्कूलमध्ये बोलताना भाजपवर कठोर शब्दात टीका केली.
Rahul Gandhi
Rahul Gandhipudhari photo
Published on
Updated on

Rahul Gandhi Vote Chori Allegations: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारतीय स्वायत्त संस्थाचा एका हत्यारासारखा वापर करून सत्ताधारी भाजपला मदत केली जात आहे असा जुन्याच आरोपांचा नवा सुर आळवला आहे. राहुल गांधी यांनी बर्लीनमधील हेरटाय स्कूलमध्ये बोलताना भाजपवर कठोर शब्दात टीका केली. त्यानंतर भाजपच्या जेपी नड्डा यांनी देखील काँग्रेस परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत असा नेहमीचाच आरोप केला.

Rahul Gandhi
National Herald case : सोनिया गांधी, राहुल गांधींना 'ईडी'च्या याचिकेवर हायकोर्टाची नोटीस

संस्थांचा हत्यार म्हणून वापर

राहुल गांधी बर्लीनमध्ये बोलताना म्हणाले, 'आम्हाला भारतीय निवडणूक संस्थेत समस्या आहे असं मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे देशतील सर्व स्वायत्त संस्थांचे फ्रेमवर्क मोठ्या प्रमाणावर कॅप्चर केलं गेलं आहे. ज्यावेळी तुम्ही आमच्या तपास यंत्रणांच्याकडे पाहता.. सीबीआय, ईडी या सत्ताधाऱ्यांचे हत्यार झाल्या आहेत. तुम्ही ईडी अन् सीबीआयने भाजपच्या लोकांविरूद्ध दाखल केलेल्या केसेस किती आहेत हे पाहा. तुम्हाला उत्तर हे शून्यच मिळेल. त्याचवेळी विरोधकांवर दाखल झालेल्या केसेस पाहा.'

गांधी पुढे म्हणाले, 'सध्या असं वातावरण आहे की ज्या संस्थांनी ज्या प्रकारे त्यांचे काम करणं अपेक्षित आहे ते त्या पद्धतीनं काम करताना दिसत नाहीयेत. आमच्या काँग्रेसच्या दृष्टीकोणातून आम्ही या संस्थाचे फ्रेमवर्क तयार करण्यासाठी मदत केली. पण आम्ही कधी या संस्थाची फ्रेमवर्क आमची आहे असे त्याकडे पाहिले नाही.

Rahul Gandhi
Congress Rally : 'मी प्रश्न विचारले; पण निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही' : राहुल गांधी

काँग्रेस - भाजपच्या दृष्टीकोणात मोठा फरक

मात्र भाजप अशा पद्धतीनं पाहत नाही. भाजप भारताच्या स्वायत्त संस्थांच्या फ्रेमवर्ककडे ते त्यांच्या मालकीचे असल्यासारखं पाहतात. त्यामुळे ते त्याच्याकडे राजकीय ताकद निर्माण करण्याचं एक टूल म्हणून पाहतात. तुम्ही भाजप आणि विरोधी पक्षांना मिळणाऱ्या निधीकडेच पाहा. तुम्हाला त्याचा रेशो हा ३० टू १ असा आहे.'

राहुल गांधी यांनी अशा परिस्थितीत देखील भाजपला काऊंटर करण्यासाठी विरोधकांनी मार्ग शोधला पाहिजे असं सांगितलं. ते म्हणाले, 'आम्ही फक्त निवडणुकीत काहीतरी घोटाळा आहे असं म्हणून चालणार नाही. आम्हाला त्या समस्येशी लढावं लागेल. त्यासाठी आम्ही एक पद्धत तयार करत आहोत. विरोधकांचा विरोध यशस्वी होईल अशी सिस्टम तयार करणार आहोत.

Rahul Gandhi
China nuclear missile: चीनची धोकादायक चाल.. तीन ठिकाणी १०० पेक्षा जास्त अण्वस्त्र क्षेपणास्त्रे केली तैनात...

इंडिया आघाडीबाबत देखील वक्तव्य

राहुल गांधी हे इंडिया आघाडीकडे ते वेगळ्या नजरेने पाहतात असं देखील म्हणाले. त्यांनी, 'तुम्ही याकडे एका वेगळ्या दृष्टीकोणातून पाहा. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष हे आरएएसच्या मूळ विचारधारेशी सहमत नाहीत. हाच खरा मुद्दा आहे. तुम्ही त्यांना विचारा कोणीही आम्ही आरएएसच्या विचारधारा मानतो असं म्हणणार नाही. त्यामुळे आम्ही या प्रश्नावर एकत्रच आहोत. मात्र निवडणुकीच्या वेळी आम्ही याच्याकडे रणनैतिक दृष्टीकोणातून पाहतो. आम्ही त्यांच्या सोबत सतत काम करत आहोतच.'

राहुल गांधी यांनी ज्यावेळी विरोधकांची एकजूट दाखवण्याची गरज असते त्यावेळी आम्ही ती दाखवतोच असं सांगितल. ते म्हणाले, तुम्ही संसदेचं उदाहरण घेऊ शकता. इथं भाजपनं आणलेल्या बीलवर आक्षेप असेल तर आम्ही एकत्ररित्या विरोध करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news