Congress Rally : 'मी प्रश्न विचारले; पण निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही' : राहुल गांधी

दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसची 'मत चोरी' विरोधात सभा
Delhi Congress Rally
'मत चोरी' आणि मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर)विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसच्‍या वतीने आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी. photo ANI
Published on
Updated on
Summary

निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे

भाजपकडे सत्ता आहे, ते मते चोरतात

सत्य ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणते; पण मोहन भागवत म्हणतात , शक्ती हीच महत्त्वाची

Delhi Congress Rally

नवी दिल्‍ली : 'मत चोरी' आणि मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर)विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज काँग्रेसच्‍या वतीने सभा आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी आरएसएस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे. मी प्रश्न विचारले पण निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही."

राहुल गांधी यांचा आरएसएस-भागवतांवर हल्ला

लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी म्हणाले, "मी येथे येत असताना मला सांगण्यात आले की मोहन भागवत यांनी अंदमान आणि निकोबारमध्ये एक विधान केले होते. गांधीजी म्हणायचे की, सत्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या धर्मात सत्य ही सर्वात महत्वाची गोष्ट मानली जाते; पण मोहन भागवत यांचे विधान ऐका: 'जग सत्याकडे नाही तर सत्तेकडे पाहते. ज्याच्याकडे सत्ता आहे तो सर्वात महत्वाचा मानला जातो.' ही मोहन भागवतांची विचारसरणी आहे, ही आरएसएसची विचारसरणी आहे. आमची विचारसरणी, भारताची, हिंदू धर्माची आणि जगातील प्रत्येक धर्माची, सत्य ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणते; पण मोहन भागवत म्हणतात की, सत्याला काही अर्थ नाही; शक्ती हीच महत्त्वाची आहे. मी तुम्हाला हमी देतो की सत्य घेऊन आणि त्याच्या मागे उभे राहून आपण नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएसच्या सरकारला सत्तेवरून काढून टाकू."

Delhi Congress Rally
Australia Shooting : ऑस्ट्रेलियातील 'बॉन्डी बीच'वर गोळीबार; हल्‍लेखोरासह 12 ठार

निवडणूक आयोग भाजपसोबत संगनमताने काम करत आहे: राहुल गांधी

निवडणूक आयोग भाजप सरकारसोबत संगनमताने काम करत आहे भाजपकडे सत्ता आहे, ते मते चोरतात, निवडणुकीदरम्यान ते १०,००० रुपये देतात, त्यांचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी आहेत. निवडणूक आयोग भाजप सरकारसोबत संगनमताने काम करत आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी कायदा बदलला. आता नवीन कायद्‍यानुसार निवडणूक आयुक्त काहीही करत असले तरी त्यांच्यावर खटला चालवता येणार नाही. आम्ही हा कायदा बदलू. आम्ही सत्यासाठी लढत आहोत आणि तुम्ही खोट्याच्या बाजूने उभे आहात." असेही राहुल गांधी म्‍हणाले.

प्रमुख समस्‍यांवर चर्चा करण्‍याची सरकारची हिंमत नाही : प्रियांका गांधी

,"आज संसदेच्या अधिवेशनात एक किंवा दोनच चर्चा होतात. राहुल गांधी आणि खर्गे यांनी निवडणुका, एसआयआर आणि मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सत्ताधारी घाबरले. ते वंदे मातरमवर चर्चा करण्यास कसे सहमत झाले? ते राष्ट्रगीत कोणाचे आहे, ते कसे तयार झाले आणि ते का तयार झाले यावर आपण संसदेत चर्चा करत आहोत. तुम्ही ज्या प्रमुख समस्यांशी झुंजत आहात, बेरोजगारी, महागाई आणि पेपर लीक - यावर चर्चा करण्याची हिंमत त्यांच्यात नाही, अशा शब्‍दांमध्‍ये काँग्रेस नेत्‍या प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली.

Delhi Congress Rally
Imran Khan's ex-wife : ‘तुम्ही वचन दिले होते...’: इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी जेमिमा यांचे मस्क यांना पत्र

फक्त काँग्रेस पक्षाची विचारसरणीच देशाला वाचवू शकते: खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्‍हणाले की, "राहुल गांधी या देशासाठी आणि लोकांसाठी लढत असलेल्या लढ्याला बळकटी देणे ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही त्या विचारांना बळकटी दिली नाही तर ते तुमचे आणि देशाचे नुकसान आहे. राहुल गांधी आमचे विचार पुढे नेत आहेत, म्हणून त्यांच्या विचारांना एकत्र आणणे आणि बळकटी देणे आणि काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीसह पुढे जाणे ही आपली जबाबदारी आहे. फक्त काँग्रेस पक्षाची विचारसरणीच देशाला वाचवू शकते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news