Rahul Gandhi Election Commission protest | निवडणूक आयुक्त आम्हाला भेटत का नाहीत?

राहुल गांधी यांचा सवाल; आंदोलनावेळी खासदारांची पोलिसांशी झटापट, दिल्लीच्या आकाशवाणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप
Rahul Gandhi Election Commission protest
नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, ठिय्या मांडलेल्या राहुल निवडणूक आयुक्तांना भेटण्याचा त्यांचा आग्रह कायम होता. काही वेळानंतर राहुल गांधींना सोडण्यात आले
Published on: 
Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तत्काळ हटविण्याची मागणी करत 'इंडिया' आघाडीच्या वतीने मंगळवारी संसद भवनापासून मोर्चा काढण्यात आला. तो अडवल्यानंतर विरोधी खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या देत घोषणाबाजी सुरू केली. आकाशवाणी भवन परिसरातील ठिय्यादरम्यान राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. आम्ही कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करतो. ३०० हून अधिक लोकसभा आणि राज्यसभा खासदार शांततेच्या मार्गान मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी जात होते. ते आम्हाला का भेटत नाहीत, आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्यापासून आम्हाला का रोखले जात आहे? असा सवाल त्यांनी केला.

Rahul Gandhi Election Commission protest
Rahul Gandhi political strategy | राहुल गांधींच्या गनिमी काव्यामुळे केंद्र सरकार त्रस्त

राहुल गांधींचा गनिमी कावा

सकाळी ११ वाजता इंडिया आघाडीचा मोर्चा अडवण्यात आला. १२ वाजता पासून पोलिसांनी खासदारांना स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली, १२.२० वाजता राहुल गांधींना देखील पोलीस बसकडे घेऊन जात होते. राहुल गांधींनी मात्र आकाशवाणी भवनाच्या गेटकडे जाण्याचा इशारा केला, पोलिसांना वाटले त्यांना तिथे कोणाशी बोलायचे आहे, त्यामुळे त्यांना तिथे जाऊ देण्यात आले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अशा पद्धतीने ते आकाशवाणी भवनात गेले आणि तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले. राहुल गांधींचा गनिमी कावा पोलिसांना कळायला खूप उशीर लागला.

Rahul Gandhi Election Commission protest
Narendra Modi Leadership: विघ्नहर्ता विनायकाचा आशीर्वाद घेऊन मोदींनी केली नेतृत्वाची पंचविशी साजरी

रात्री आठ वाजता आकाशवाणी परिसर रिकामा

ज्ञानेश कुमार यांना भेटू दिले जाणार नाही, तोपर्यंत आकाशवाणी परिसरातून हटणार नाही, असा पवित्रा राहुल गांधींनी घेतला. शेवटी रात्री आठ वाजतापर्यंत त्यांच्यासह प्रियंका गांधी आणि इतर सर्व खासदारांनाही ताब्यात घेतले होते. आकाशवाणी भवन परिसर रिकामा करण्यात आला.

राहुल गांधींची रात्रभर थांबण्याची होती तयारी

राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सहकारी खासदार आकाशवाणी भावनात रात्रभर थांबण्यास तयार होते. मुख्य निवडणूक आयुक्तांना आम्हाला का भेटू दिले जात नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आणि संध्याकाळ होईपर्यंत तिथे चटया, गाद्या आणि आवश्यक वस्तू आणण्यात आल्या. थोडक्यात, रात्रभर तिथे थांबण्याचे नियोजन होते.

मोदी-शहा असो वा भागवत, कुणीही सुटणार नाही : राहुल गांधी

देशाच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना निवडणूक आयोग भेटणार नसेल तर लोकशाहीचा अर्थ काय, असा सवाल करून राहुल गांधी यावेळी म्हणाले, माझ्या देशासोबत जे केले गेले आहे, तो देशद्रोह आहे. नरेंद्र मोदी असोत, अमित शहा, ज्ञानेश कुमार असोत किंवा मोहन भागवत असोत, आता कोणीही सुटणार नाही. सर्वाविरोधात कारवाई होईल, या सर्वांनी मिळून मत चोरीच्या माध्यमातून देशाची लोकशाही हायजॅक केली, असा आरोपही त्यांनी केला.

प्रणिती शिंदेंसह खासदार पोहोचले राहुल गांधींपर्यंत

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवनच्या आवारात प्रवेश केला, यावेळी इतर कोणत्याही काँग्रेस खासदाराला आत प्रवेश करता आला नाही. दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे आकाशवाणी भवनमध्ये पोहोचल्या; पण त्यांना आत जाण्याचा मार्ग सापडला नाही. त्यांनी माध्यम प्रतिनिधींना आत जाण्याचा मार्ग विचारला. त्यांनी त्यांना कुंपणातील लोखंडी सळ्यांमधील लहान जागेतून आत जाण्याचा सल्ला दिला. भिंत चढून प्रणिती शिंदे त्या लहान जागेतून निसटण्यात यशस्वी झाल्या. त्यानंतर थोड्याच वेळात, इतर काँग्रेस खासदारांना प्रवेशद्वारातून आकाशवाणी भवनात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.

भेटीबाबत अधिकृत विनंती नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

विरोधी पक्षांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते किंवा कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक आयुक्तांच्या भेटीसंदर्भात कोणतीही अधिकृत विनंती अथवा अर्ज प्राप्त झाला नव्हता, असा निर्वाळा आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियमांनुसारच कामकाज चालत असल्याचे स्पष्ट करत, कोणत्याही पक्षाने संवादासाठी रीतसर वेळ मागितली नव्हती, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

रात्री आठ वाजता आकाशवाणी परिसर रिकामा

ज्ञानेश कुमार यांना भेटू दिले जाणार नाही, तोपर्यंत आकाशवाणी परिसरातून हटणार नाही, असा पवित्रा राहुल गांधींनी घेतला. शेवटी रात्री आठ वाजतापर्यंत त्यांच्यासह प्रियंका गांधी आणि इतर सर्व खासदारांनाही ताब्यात घेतले होते. आकाशवाणी भवन परिसर रिकामा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news