Rahul Gandhi on NEET exam | शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ बडतर्फ करा; NEET पेपरफुटीवरून राहुल गांधींची मागणी

आरएसएस आणि भाजपच्या युतीने शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्‍याचा आरोप
Rahul Gandhi on NEET exam
लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी. Pudhari
Published on
Updated on

Rahul Gandhi on NEET exam

NEET-UG पेपरफुटीमुळे २२ लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून बडतर्फ करा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

"मोदी जी, धर्मेंद्र प्रधान यांना आत्ताच्या आत्ता बडतर्फ करा"

पेपरफुटी प्रकरणी केलेल्‍या एक्‍स पोस्‍टमध्‍ये राहुल गांधी यांनी म्‍हटलं आहे की, २२ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या तयारीसाठी दोन वर्षे रात्रंदिवस मेहनत केली होती, मात्र त्यांची ही मेहनत वाया गेली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच NEET चा पेपर व्हॉट्सॲपवर (WhatsApp) वाटण्यात आला होता, हे संपूर्ण देशाला माहीत आहे," असा आरोप त्यांनी केला.शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या वादाची जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

एका समितीची शिफारस धमेंद्र प्रधान यांनी कचर्‍याच्‍या डब्‍यात फेकली

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात की माझा याच्याशी काहीही संबंध नाही. एका समितीने शिफारस केली होती, पण त्यांनी ती कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. समितीमध्ये विरोधक बसले आहेत, त्याला काही अर्थ नाही, तिची काही गरज नाही, असे ते म्‍हणाले होते, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

Rahul Gandhi on NEET exam
NEET UG Online Exam: पुढील वर्षापासून NEET परीक्षा ऑनलाइन; OMR शीटला ब्रेक, पेपरफुटीनंतर केंद्राचा मोठा निर्णय

'आरएसएस आणि भाजपच्या युतीने शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली'

आरएसएस (RSS), भाजप (BJP) आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे. तुम्ही हिंदुस्थानच्या गाभ्यालाच इजा पोहोचवली आहे. हे एक मोठे रॅकेट आहे. आरएसएस, भाजप आणि विद्यापीठांमधील त्यांचे सहकारी: कुलगुरू (VC) आणि प्राध्यापक. त्यांच्यामध्ये पैसे कमावण्याचे हे साटेलोटे असून त्यांनी हिंदुस्थानची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे," असे आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

Rahul Gandhi on NEET exam
NEET UG paper leak case | 'नीट'पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, पाच आरोपींना अटकेत अनेक ठिकाणी छापेमारी

आरएसएसचे असाल तरच तुम्ही कुलगुरू होऊ शकता

"संपूर्ण देशाला माहीत आहे की जर तुम्हाला कुलगुरू व्हायचे असेल, तर तुम्हाला विषयाचे ज्ञान किंवा अनुभवाची गरज नाही. तुम्ही आरएसएसचे असाल तर तुम्ही कुलगुरू होऊ शकता. पण तुमची विचारसरणी आरएसएसची नसेल, तर तुम्ही कुलगुरू होऊ शकत नाही," असा आरोप त्यांनी केला.

Rahul Gandhi on NEET exam
NEET Paper Leak: नीटचा पहिला पेपर कुठे फुटला; तो देशभरात कसा परसरला? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

'८० वेळा पेपर लीक, २ कोटी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त'

या समस्येचा संबंध देशातील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीशी जोडत राहुल गांधींनी दावा केला की, देशात आतापर्यंत ८० वेळा पेपर लीक झाले आहेत आणि यामुळे दोन कोटी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. याच कारणामुळे या देशात ८० वेळा पेपर लीक झाले आहेत आणि दोन कोटी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे," असे ते म्हणाले.

Rahul Gandhi on NEET exam
NEET UG 2026 Paper Leak | 'ग्रेस मार्क्स' मिळवून १२वी पास झालेल्या मुलासाठी आरोपीने 'खरेदी' केला होता पेपर!

नीट पेपरफुटीप्रकरणी देशभरात संतापाची लाट

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३ मे रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता निम-प्रवेश परीक्षा (NEET-UG) परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांनंतर रद्द करण्यात आली होती. यामुळे देशभरातून तीव्र संताप आणि निदर्शने पाहायला मिळाली. सरकारने आता २१ जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news