Rahul Gandhi Convoy Accident : राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची एकमेकांना धडक

पूर्वांचल एक्सप्रेसवेवर दुर्घटना, राहुल गांधी सुरक्षित
Rahul Gandhi Convoy Accident : राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची एकमेकांना धडक
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi Convoy Accident : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील पाच गाड्या एका रुग्णवाहिकेवर आदळल्‍या. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेले नाही, असे पोलिसांनी स्‍पष्‍ट केल्‍याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

राहुल गांधी सुरक्षित

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून १०० किमी अंतरावर असलेल्या हलियापूर येथे झालेला हा अपघात ताफ्याच्या मागील भागात असलेल्या पाच गाड्यांमध्ये झाला. राहुल गांधी सुरक्षित आहेत. जखमींमध्ये ताफ्यासोबत प्रवास करणारे पक्ष कार्यकर्ते, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.

Rahul Gandhi Convoy Accident : राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची एकमेकांना धडक
Amit Shah On Rahul Gandhi: तुम्ही परदेशात का जाऊन बसलाय? एकदा दिल्लीत लँड करा.. गृहमंत्री अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Rahul Gandhi Convoy Accident : राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची एकमेकांना धडक
Rahul Gandhi | गोवा बनले भ्रष्टाचाराचे मॉडल; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल

सुलतानपूर विशेष न्यायालयात जात असताना घटना

राहुल गांधी लखनौ विमानतळावर पोहोचले होते, तिथून ते सुलतानपूरमधील खासदार/आमदार (MP/MLA) विशेष न्यायालयात जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीप्रकरणी २०१८ मध्ये दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात आज (दि. २६) निकाल अपेक्षित आहे. राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नेते जमले होते.

Rahul Gandhi Convoy Accident : राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची एकमेकांना धडक
Rahul Gandhi petition against Gyanesh Kumar : राहुल गांधींसह विरोधकांच्या याचिकेत १४ त्रुटी; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी टळली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news