चंदीगड; पुढारी ऑनलाईन : अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय असलेले कुमार विश्वास यांच्याविरोधात पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सकाळी कवी कुमार विश्वास यांच्या घरी पोलिस पोहोचले तेव्हा कोणत्या प्रकरणात ते आले आहेत. असे सवाल त्यांनी केले. तसेच कुमार विश्वास यांनी याबाबत ट्विट करत, पंजाब पोलीस पहाटे माझ्या दारात का आले ? तर पंजाबचे मुख्यमंत्री यांच्यावरही निशाणा साधला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि आज काय कारवाई होणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पंजाबमधील विधानसभा निवडणुकी दरम्यान सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर कुमार विश्वास यांनी वादग्रस्त विधान केले होते. यावेळी ते म्हणाले, आम आदमी पार्टी आणि त्याचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांचे फुटीरतावाद्यांशी संबंध आहेत. या संदर्भात 12 एप्रिल रोजी पंजाबमधील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले होते.
पंजाब पोलिसांनी या प्रकरणावर एक निवेदन दिले आहे. एसपी एच एस अटवाल म्हणाले, कुमार विश्वास यांना चौकशीअंतर्गत नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये त्यांना आरोपांविरोधात पुरावे सादर करावे असे सांगण्यात आले होते. आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच एसपी एचएस अटवाल म्हणाले, 'फिर्यादीच्या आधारे आम आदमी पार्टीच्या माजी नेत्याविरोधात रूपनगर येथील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंजाब पोलिस कुमार विश्वास यांच्या घरी आले त्यावेळी त्यांनी ट्विट केले. यामध्ये ते म्हणाले, 'पहाटे पंजाब पोलिस दारात आले. एकेकाळी मी पक्षात घेतलेल्या भगवंत मान यांना इशारा देत आहे की दिल्लीत बसलेल्या माणसाला तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात तो एक दिवस तुमची आणि पंजाबचीही फसवणूक करतील. दुसर्या ट्विटमध्ये कुमार विश्वास म्हणाले की, ' येणा-या काळाच पहा आणि निश्चित रहा. असे ते म्हणाले.
हेही वाचा