Punjab : कॅप्टनच्या विकेटनंतर पंजाबचा नवीन कॅप्टन कोण होणार?

नवज्योत सिंग सिद्धू आणि सुनील जाखड
नवज्योत सिंग सिद्धू आणि सुनील जाखड
Published on
Updated on

चंदीगड; पुढारी वृत्तसेवा : Punjab : पंजाबमधील राजकीय रणकंदन निर्णायक टप्प्यावर जाऊन पोहोचले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, राज्याच्या राजकारणात त्यांचे भविष्य काय असणार? यांची चर्चा रंगली आहे.

अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर दिलेल्या निवेदनात, कॅप्टन यांनी त्यांच्या भविष्याबद्दल संकेत दिले आहेत. कॅप्टन म्हणाले की राजकारणात नेहमीच पर्याय असतात. मी माझ्या मित्रांशी बोलल्यानंतर निर्णय घेईन. शेवटी अमरिंदर सिंग कोणत्या पर्यायाबद्दल बोलत आहेत? यावरून चर्चा सुरु झाली आहे.

ते वेगळा पक्ष स्थापन करून आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ते पंजाबमध्ये आपले सरकार स्थापन करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन यांनी सिद्धूंवर निशाणा साधला आणि सांगितले की सिद्धूंचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी संबंध आहेत आणि जर पक्षाने त्यांना चेहरा बनवला तर देशाच्या हितासाठी मी त्याला विरोध करेन.

अमरिंदर सिंग यांच्याबाबत बोलायचं झाल्यास सिद्धू यांच्या पंजाबमधील (Punjab) राजकीय प्रवेशानंतर एका म्यानमध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले होते.

पंजाबमधील अकाली-भाजप सरकारचा पराभव करून काँग्रेस सरकार स्थापन करणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विजयानंतर हायकमांडला बाजूला केले होते.

असे म्हटले जाते की कॅप्टन यांची सरकारमध्ये मनमानी होती. मुख्यमंत्री कार्यालयात येत नसल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. याचा फायदा घेत सिद्धू यांनी कॅप्टन यांच्या नाकात चांगलाच दम भरला.

Punjab : पुढील मुख्यमंत्री कोण?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल संध्याकाळी उशिरा राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टननंतर पंजाबमध्ये सरताज कोण असतील हा सर्वात मोठा मुद्दा आहे. काँग्रेसच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर सुनील जाखड हे पंजाबमधील प्रबळ दावेदार आहेत.

कारण पंजाबच्या सध्याच्या राजकारणात जाखड हायकमांडकडून अत्यंत अनुकूल चेहरा आणि राजकीय गुणवत्तेनुसार पाहिले जात आहे.  तथापि, शीख नसणे त्यांच्यासाठी अडचण असू शकते. पुढील मुख्यमंत्री कोण असेल, हा संपूर्णपणे सोनिया गांधींचा निर्णय असेल.

कॅप्टन भाजपमध्ये जाणार का?

भाजपने अंदाज लावला होता की काँग्रेस नेतृत्वाने दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सलोखा फार काळ टिकणार नाही. कारण कॅप्टन या समेटाला स्वतःसाठी सन्माननीय समझोता मानत नव्हते.

म्हणूनच पक्षाचा प्रयत्न होता की जर अमरिंदर सिंग यांना त्यांच्या प्रतिष्ठेनुसार आदर देण्याची चर्चा झाल्यास ते ते काँग्रेस सोडू शकतात.

कॅप्टन भाजपच्या राष्ट्रवादी प्रतिमेच्या निकषात बसतात आणि त्यांना सोबत घेतल्याने पक्षाच्या ताकदीत भर पडू शकते. मात्र, अमरिंदर यांनी काँग्रेस हायकमांडला वेळ देत यावर निर्णय घेण्याची घाई केली नाही.

सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजपमध्ये जाण्याऐवजी अमरिंदर वेगळा पक्ष काढण्याचा मार्ग मोकळा करू शकतात, त्यानंतर ते सत्तेवर येण्यासाठी भाजपचे सहकार्य घेऊ शकतात.

हे ही वाचलं का?

[visual_portfolio id="37589"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news