चार राज्यांतील विजयानंतर पीएम मोदींची बैठक, पुढील २५ वर्षांच्या विजयासाठी फॉर्म्युला ठरला!

2022 Gujarat Election
2022 Gujarat Election
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चार राज्यांच्या निवडणूकांतील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता २०२४ निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. नरेद्र मोदींनी विजयानंतर राज्यातील नेत्यांशी बातचीत केली. शिवाय पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चार राज्यांतील मंत्रीमंडळ नियुक्त्यांबाबत चर्चा झाली असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशच्या विजयामुळे अनेक दशकांचा इतिहास बदलला

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूका जिंकल्याने भाजपने गेल्या अनेक दशकांचा राजकीय इतिहास बदलला आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. पंतप्रधान मोदींना घेतलेल्या बैठकीत योगी आदित्यनाथही सहभागी होते. याशिवाय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर चार राज्यांतील मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबिसी यांना मंत्रीमंडळात योग्य स्थान, तर यामध्ये युवानेते, महिला आणि शैक्षणिक योग्यता पाहून मंत्रीमंडळाची रचना केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुढील २५ वर्षे देशात भाजप सत्तेत रहाण्यासाठी कार्यकर्त्य़ांना फॉर्म्युला सांगितला आहे. भाजप आणि देशात नेतृत्व निश्चिच करण्यासाठी युवकांना विशेष महत्व असेल.

संसद सदस्यांवर जबाबदारी

संसद सदस्यांना मतदारसंघात १०० मतदारसंघांची माहिती घ्या, जेथे पक्षाला चांगल यश मिळाले नाही. अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. तर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळात २० नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ११ मंत्र्यांचा पराभव झाला आणि चार मंत्र्यांनी पक्षांतर केल्याने २० नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news