भाजपला राज्यात येऊ देणार नाही ! शरद पवारांचा युवा आमदारांसमोर एल्गार | पुढारी

भाजपला राज्यात येऊ देणार नाही ! शरद पवारांचा युवा आमदारांसमोर एल्गार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भाजपने राज्यात पुन्हा सत्तेत परतण्यासाठी कंबर कसली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीमधील युवा आमदारांनी आज शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी भाजपला राज्यात सत्तेत येऊ देणार नसल्याचा एल्गार केला. दुसरीकडे त्यांनी युवा आमदारांना कानमंत्र देताना भाजपची शैली आत्मसात करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडून शिका असा सल्लाही त्यांनी दिला.

शरद पवारांची आज भेट घेणाऱ्यांमध्ये आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांचा समावेश आहे. यावेळी शरद पवार यांचा राजकीय उत्साह पाहून युवा आमदारांना चांगलेच प्रभावित झाल्याचे दिसून आले. शरद पवार यांनी युवा आमदारांसमोर भाजपला सत्तेत येऊ देणार नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर भाजपकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातही एक हाती सत्ता आणू, सत्कार समारंभात गडकरी व फडणवीसांची ग्वाही

महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहात आहेत. चार राज्यात भाजपची सत्ता येऊ नये म्हणून विरोधक देव पाण्यात बुडवून बसले होते. पण, या मुंगेरीलालांची हसीन स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाही. आता महाराष्ट्रातही भगवा फडकवीत एकहाती सत्ता आणू, अशी निसंदिग्ध ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ग्वाही दिली.

गोव्याचे प्रभारी म्हणून सर्वोत्तम कामगिरी करीत देवेंद्र फडणवीस यांनी तिथे बहुमताने विजय मिळवला. त्या नंतर नागपुरात आले असता त्यांचा नितीन गडकरी यांच्या वर्धा रोड स्थित निवासस्थनाजवळ शहर भाजपतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी उभय नेत्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास दिला. यावेळी शहर आणि जिल्हा भाजपातर्फे गडकरी यांच्या हस्ते फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी विमानतळ ते गडकरी निवासस्थानापर्यत मोठी रॅली काढण्यात आली. यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button