UGC Syllabus : यूजीसीकडून PhD प्रवेशाच्या नियमांत मोठे बदल!

UGC Syllabus : यूजीसीकडून PhD प्रवेशाच्या नियमांत मोठे बदल!
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : विद्यापीठ अनुदान आयोगा (UGC Syllabus)ने एक मोठे पाऊल उचलले आहे. आयोगाने यंदापासून एमफिल (M. Phil.) पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच यूजीसी रेग्युलेशन २०२२ अंतर्गत इतरही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आता शिक्षक/प्राध्यापकांना सेवानिवृत्तीनंतरही पुन्हा विद्यापीठात काम करण्याची संधी दिली जाणार आहे. यासोबतच संशोधन क्षेत्रात वयाच्या ७० वर्षापर्यंत पीएचडी करता येणार आहे. (UGC Syllabus)

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) लवकरच विद्यापीठांमध्ये चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम (UGC Syllabus) सुरू करणार आहे. १० मार्च रोजी झालेल्या यूजीसी अध्यक्ष आणि सदस्यांच्या ५५६ व्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. यूजीसी लवकरच अधिकृत चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या बैठकीत पीएचडीच्या नियमांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. (UGC Syllabus)

याआधी यूजीसीने घोषणा केली होती की, आता विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी पीएचडी अनिवार्य नाही. यूजीसीचे चेअरपर्सन प्रोफेसर एम जगदीश कुमार म्हणाले होते की, असे अनेक तज्ञ आहेत जे शिकवण्यास इच्छुक आहेत. तळागाळात काम करण्याचा भरपूर अनुभव असलेले अनेक लोक आहेत. सध्याच्या नियमांनुसार त्यांना शिकवण्याची परवानगी नाही. त्यासाठी विशेष पदे निर्माण केली जात आहेत. (UGC Syllabus)

या संदर्भात, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एक प्रारूप आराखडा तयार केला आहे. हे अंमलात आणल्यावर, पुढील शैक्षणिक सत्रापासून बॅचलर डिग्री ते पीएचडीपर्यंतच्या उच्च शिक्षण रचनेवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने असेल. लवकरच ते सार्वजनिक प्रकाशित होण्याची शक्यता आहे. (UGC Syllabus)

यूजीसीने पीएचडी प्रवेशाचे नियम बदलले… (UGC Syllabus)

  • पीएचडी कमाल कालावधी सहा वर्षे निर्धारित केला आहे. शैक्षणिक वर्षाच्या एकूण रिक्त जागांपैकी साठ टक्के जागा NET/JRF पात्र विद्यार्थ्यांमधून भरल्या जातील आणि उर्वरित 40 टक्के जागा मुलाखतीच्या आधारे विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेच्या पात्र विद्यार्थ्यांमधून भरल्या जातील.
  • आता या सगळ्या ड्राफ्ट नंतर UGC या सगळ्यावर सूचना आणि अभिप्राय पब्लिक डोमेनमधून मागण्याची शक्यता आहे

नवीन पदवी अभ्यासक्रम कसा असेल?

चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरु शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने केला आहे. हा नवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार करताना सुद्धा विद्यार्थ्यांना मल्टी एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असतील. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने चार वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि मध्येच त्यांनी अभ्यासक्रम सोडला तर त्याला सोडलेल्या वर्षापासून पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल आणि पुढे हा अभ्यासक्रम पूर्ण करु शकतो.

  • अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर एक वर्ष म्हणजेच 2 सेमिस्टर विद्यार्थ्याने पूर्ण केल्यास त्याला निवडलेल्या अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र दिले जाईल
  • या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वर्ष म्हणजे 4 सेमिस्टर पूर्ण केल्यास विद्यार्थ्याचा डिप्लोमा पूर्ण होईल
  • या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना तीन वर्ष म्हणजे सहा सेमिस्टर्स पूर्ण केल्यास त्याला बॅचलर डिग्री मिळेल. हा विद्यार्थी आधी प्रमाणेच दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल
  • अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने पूर्ण चार वर्ष आठ सेमिस्टर पूर्ण केल्यास त्याला चार वर्षाची बॅचलर डिग्री मिळणार असून हा विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पीएचडी प्रवेशासाठी पात्र असेल महत्त्वाचे मुद्दे…

यूजीसी ४ वर्षाचा नवा पदवी अभ्यासक्रम

  • विद्यार्थ्याने १ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याला निवडलेल्या अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र मिळेल
  • विद्यार्थ्यांने दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थ्याचा डिप्लोमा पूर्ण होईल
  • अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने तीन वर्ष पूर्ण केल्यास त्याला बॅचलर डिग्री मिळेल
  • अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने 4 वर्ष पूर्ण केल्यास त्याला चार वर्षाची बॅचलर डिग्री मिळेल
  • ४ वर्ष पूर्ण अभ्यासक्रम झालेला विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र असेल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news