नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली सेवा विधेयकाला मंजूरी दिली आहे.राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी नंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाले आहे. भारत सरकारच्या अधिसूचनेत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार (दुरुस्ती) कायदा,२०२३ लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.