पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोने केला प्रवास, प्रवाशांशी साधला संवाद | पुढारी

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोने केला प्रवास, प्रवाशांशी साधला संवाद

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहोळ्यास उपस्थित राहण्यापूर्वी तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास करून प्रवाशांसोबत संवाद साधला.

पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख असलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण या कार्यक्रमापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रास्तावित मेट्रोसह दुमजली उड्डाणपुलाच्या कामाबाबत अजित पवार यांनी पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर चांदणी चौकातील कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान अजित पवार यांनी नागरिकांशीदेखील संवाद साधला.

हेही वाचा

भविष्यात हवेत चालणाऱ्या बसेस पुण्यात आणणार : नितीन गडकरी

सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ ठरतेय मृत्यूचे ठिकाण

नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन

Back to top button