Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचं आश्रम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता मुलगा आणि महिला बेपत्ता, कुटुंबीय थेट आंदोलनाला बसले

Premanand Maharaj Ashram: वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून, १७ वर्षीय अनुज चौधरी बेपत्ता असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Premanand Maharaj Ashram
Premanand Maharaj AshramPudhari
Published on: 
Updated on: 

Premanand Maharaj Ashram: वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांचे राधा केलि कुंज आश्रम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका शिष्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आता आश्रमाशी संबंधित आणखी काही घटना घडल्या आहेत. आश्रमात आलेला १७ वर्षीय अनुज चौधरी हा मुलगा बेपत्ता झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मुलाचा शोध घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय प्रेमानंद महाराजांच्या आश्रमासमोर आंदोलनाला बसले आहेत. अनुजला सुखरूप परत आणावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच आश्रमातील काही शिष्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

याचदरम्यान नोएडाहून प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात आलेली एक महिलाही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तिचे वडील मुलीचा शोध घेत वृंदावनमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय आश्रमाबाहेरील एका ढाब्यावर काम करणाऱ्या महिलेचे १० वर्षांचे मूलही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनांमुळे आश्रमातील व्यवस्थेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

सोशल मीडियामुळे प्रेमानंद महाराजांची लोकप्रियता वाढली

प्रेमानंद महाराज गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. २०२३ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या मुलीसह त्यांच्या आश्रमात पोहोचले होते. त्यानंतर प्रेमानंद महाराजांची देशभरात मोठी चर्चा झाली.

सोशल मीडियावर त्यांच्या सत्संगाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. त्यांच्या रात्रीच्या पदयात्रेलाही मोठी गर्दी होऊ लागली. अनेक प्रसिद्ध व्यक्ती आश्रमात येऊ लागल्याने त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांची रात्रीची पदयात्रा बंद असल्याचे सांगितले जात आहे.

Premanand Maharaj Ashram
Yuzvendra Chahal Retirement: युजवेंद्र चहलने अचानक घेतला मोठा निर्णय! फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती, पण...

यूट्यूबवरही नव्या सत्संगाचे व्हिडिओ बंद

प्रेमानंद महाराजांच्या यूट्यूब चॅनेलवर यापूर्वी सत्संगाचे व्हिडिओ नियमितपणे प्रसिद्ध होत होते. त्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळत होते. काही काळ जुन्या व्हिडिओंचे प्रसारण सुरू होते. मात्र, आता तेही बंद झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या अनुयायांमध्येही विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

Premanand Maharaj Ashram
Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पठाण, अ‍ॅनिमल आणि धुरंधरला टाकलं मागे, किती कोटी कमावले?

आश्रमाच्या नव्या ठिकाणाबाबतही चर्चा

काही काळापूर्वी प्रेमानंद महाराज यमुना नदीच्या पलीकडे नवीन आश्रम उभारत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर ते त्या ठिकाणी गेल्याचेही सांगितले जाते. याबाबत आश्रमाकडून कोणतेही स्पष्ट कारण समोर आले नसले तरी यामुळे विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली. आता एका पाठोपाठ एक बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्याने आश्रम पुन्हा चर्चेत आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news