Shocking News : पतीने 'DNA' टेस्टचा आग्रह धरताच ५ महिन्यांच्या गर्भवती पत्नीने संपवले जीवन; संशयाने घेतले दोन जीव!

डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाच्या चर्चेवेळी केलेली टेस्टची मागणी लागली जिव्हारी
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Shocking crime news : फक्त १८ महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात त्यांचे लग्न झाले होते. संसार सुखाने सुरू असतानाच, पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या संसारात एका नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली. पत्नीने याची माहिती पतीला दिली; मात्र त्‍याच्‍या मनात संशयाचे भूत संचारले होते. त्याने थेट जन्माला येणाऱ्या बाळाच्या पितृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्नीकडे 'डीएनए' (DNA) चाचणीची मागणी केली. आपल्या चारित्र्यावर पतीने घेतलेला संशय पत्नीला सहन झाला नाही. या प्रचंड मानसिक धक्क्यातून तिने थेट आपले जीवनच संपवले. ही हृदयद्रावक घटना तेलंगणातील मेदक जिल्ह्यातील अल्लादुर्ग मंडळातील गडीपेड्डापूर गावात घडली आहे. या प्रकरणी पतीसह विवाहितेच्या सासूला अटक करण्यात आली आहे.

१८ महिन्यांपूर्वीच लग्न...

विवाहितेची आई जनाबाई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुष्मिता हिचे १८ महिन्यांपूर्वी जी. अभिलाष यांच्याशी लग्न झाले होते. ती पाच महिन्यांची गर्भवती होती. पतीला तिच्या चारित्र्यावर संशय होता. सासूकडूनही आपल्या मुलीला वाईट वागणूक दिली जात होती.

Crime News
Crime News : दिल्लीतील 'त्या' तिघांचा मृत्‍यू अग्निकांडात नव्‍हे, 'सीसीटीव्ही'मुळे उघड झाला धक्कादायक कट!

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या चर्चेवेळी पतीने केली DNA टेस्‍टची मागणी

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुष्मिताचे आई-वडील २३ जून रोजी 'डोहाळे जेवणा'च्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. यावेळी पती अभिलाषने दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. समाजातील ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण तात्पुरते मिटले; परंतु त्यानंतरही छळ सुरूच राहिला.

Crime News
Crime News: पत्नीवर CCTV ची पाळत, शेजाऱ्यांशी बोललं तरी मारहाण, छळाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या ४८ दिवसांतच जीवन संपवले

मानसिक धक्क्यातून पत्नीने जीवन संपवले

आपल्या चारित्र्यावर पतीने घेतलेला हा भयंकर संशय सुष्मिताला सहन झाला नाही. आई-वडील गेल्यानंतर दोन दिवसांनी तिने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

Crime News
Sangli news: "गावाकडची आहेस, मला तू पसंत नव्हतीस...", लग्नानंतर नवऱ्याकडून छळ; सांगलीतील धक्कादायक घटना

पतीसह सासूला अटक

या प्रकरणी जनाबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती जी. अभिलाष आणि त्याच्या आईविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ (पती किंवा नातेवाईकांकडून क्रूरता), कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम ३(५) (सामायिक उद्देश/गुन्हेगारी हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news