Crime News : दिल्लीतील 'त्या' तिघांचा मृत्‍यू अग्निकांडात नव्‍हे, 'सीसीटीव्ही'मुळे उघड झाला धक्कादायक कट!

Delhi Fire CCTV Footage : तिघांना अटक, अल्पवयीन मुलगीही ताब्यात
Delhi Fire CCTV Footage
अल्‍पवयीन मुलीने लावलेल्‍या आगीत दुचाकी बेचिराख झाल्‍या. Pudhari
Published on
Updated on

Delhi Fire CCTV Footage : दक्षिण दिल्लीतील तुघलकाबाद भागात शुक्रवार, १२ जून रोजी एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून दोन चुलत भावांमधील पैशांच्या वादातून रचलेला एक 'भयंकर कट' असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

तिघांना अटक, अल्पवयीन मुलगीही ताब्यात

याप्रकरणी निरंजन (३३), त्याचा भाऊ राजकुमार (२७) आणि सरिता (२७) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेली महिला आणि अल्पवयीन मुलगी या दोन आरोपी पुरुषांच्या परिचयातील (नात्यातील) असल्याचे सांगण्यात येत आहे.

Delhi Fire CCTV Footage
Panvel Crime | लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणारा प्रियकर अटकेत

मुलीने दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जूनच्या मध्यरात्री इमारतीच्या खाली पार्क केलेल्या स्कूटरला आपणच आग लावली, अशी कबुली या अल्पवयीन मुलीने दिली आहे. ही आग वेगाने पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आणि तिने संपूर्ण इमारतीला वेढले. या घटनेनंतर आठ जणांना सुखरूप बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना पंकज, सुशीला देवी आणि सोनिया कुमारी या तिघांचा मृत्यू झाला.

Delhi Fire CCTV Footage
Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नीची छेड काढल्याच्या संशयावरून मित्राची दगडाने ठेचून केली हत्या

सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा पर्दाफाश

सुरुवातीला हा अपघात आणि निष्काळजीपणाचा प्रकार असावा असं वाटत होतं. मात्र, आग लागण्यापूर्वी मुलगी इमारतीत प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले. या फुटेजच्या आधारे त्या अल्पवयीन मुलीची ओळख पटवून तिला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान या मुलीने सांगितले की, सरिताने तिला दीपकच्या स्कूटरला आग लावण्यास प्रवृत्त केले होते. दीपक हा निरंजनचा चुलत भाऊ असून तो याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहत होता. एवढेच नाही तर सरितानेच तिला पेट्रोल आणि काडेपेटी दिली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Delhi Fire CCTV Footage
Crime News: 'हे आपले शेवटचे बोलणे...'; पत्नीने सकाळी लवकर उठवले म्हणून संतापलेल्या पतीने स्वतःवर गोळी झाडली

पैशांचा वाद ठरला कारणीभूत

दीपक आणि निरंजन यांच्यात गेल्या काही काळापासून पैशांवरून वाद सुरू होता. यातूनच हा प्रकार घडला. निरंजन हा नुकताच एका दुसऱ्या गुन्ह्यातून तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, सदोष मनुष्यवध, हत्येचा प्रयत्न, आगीद्वारे नुकसान करणे आणि अनधिकृत प्रवेश करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news