प्रज्वल रेवन्ना 31 मे रोजी SIT समोर हजर राहणार, स्वतःच व्हिडीओ शेयर करत दिली माहिती

प्रज्वल रेवन्ना 31 मे रोजी SIT समोर हजर राहणार, स्वतःच व्हिडीओ शेयर करत दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी प्रज्वल रेवन्ना यांना भारतात परतण्यास आणि लैंगिक शोषण प्रकरणात चौकशीला सामोरे जाण्यास सांगितले. जेडी(एस) हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी एक व्हिडिओ शेअर करत 31 मे रोजी एसआयटी चौकशीला हजर राहणार असल्याचे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये प्रज्वल यांनी म्हटले आहे की, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ते स्वतः एसआयटीसमोर हजर होईन. तसेच तपासाला पूर्ण सहकार्य करतील. कर्नाटक सरकारने त्याच्यांवरील आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केल्यानंतर प्रज्वल भारतातून फरार झाले होते.

राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते याबद्दल आणि माझ्या विरोधात बोलू लागले आणि माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. "माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मी तपासाला संपूर्ण समर्थन देईन, असे प्रज्वल यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. आपला परदेश दौरा पूर्वनियोजित होता आणि 26 एप्रिलला निवडणुका झाल्या. तेव्हा त्याच्याविरुद्ध कोणताही खटला नव्हता आणि एसआयटीही स्थापन करण्यात आली नव्हती, असा दावाही त्यांनी केला आहे.

मी माझ्या आई-वडिलांची माफी मागतो

ते म्हणाले आहेत की, "मी माझ्या आई-वडिलांची माफी मागतो. मी डिप्रेशनमध्ये होतो. मी (भारतात परत) येईन आणि 31 मे रोजी एसआयटी समोर हजर होईल." देशातून पळून गेल्याच्या चार दिवसांनंतर रेवन्ना यांनी X वर एक पोस्ट केली होती. त्यात ते म्हणाले होते की, "मी बंगळूरमध्ये नाही… मी माझ्या वकिलामार्फत (पोलिसांशी) संवाद साधला आहे. लवकरच सत्याचा विजय होईल."

प्रज्वल यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "मी माझ्या ट्रिपवर असताना मला आरोपांची माहिती मिळाली. 23 मे रोजी, जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी प्रज्वल यांना भारतात परतण्याचा आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणी कायद्याला सामोरे जाण्याचा कडक इशारा दिला होता. त्यानंतर देवेगौडा यांनी प्रज्वल यांना देश सोडण्यास मदत केल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. 24 मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने प्रज्वलला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. प्रज्वलचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याच्या कर्नाटक सरकारच्या विनंतीवरही परराष्ट्र मंत्रालय प्रक्रिया करत आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या घटनेवर एकमेकांवर हल्ला चढवला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ कारवाई न केल्याबद्दल जुन्या पक्षाला दोष दिला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news