Bengaluru CMS Cash Van Looted
Bengaluru CMS Cash Van LootedPudhari photo

Crime News: फ्लाय ओव्हरवर Money Heist स्टाईल दरोडा! RBI चे अधिकारी म्हणून आले अन् ३० मिनिटात ७ कोटी रूपये लुटून गेले

Bengaluru daylight dacoities: आरबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव केला अन् फिल्मी स्टाईलनं ७ कोटी रूपये लुटून नेले.
Published on

Bengaluru CMS Cash Van Looted In 30 Minutes:

बंगळुरूमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्यात तब्बल ७.१ कोटी रूपये लुटीचा प्रकार घडला आहे. दक्षिण बंगळुरूच्या फ्लाय ओव्हरवर बुधवारी दुपारी हा दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी आपण RBI चे अधिकारी असल्याचा बनाव केला होता.

दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास CMS Info Systems ची व्हॅन ही जेपी नगरमधील एचडीएफसी बँकेतून तीन बॉक्स कॅश घेऊन निघाली होती. त्याना २२ किलोमीटर लांब असणाऱ्या HBR Layout कडे जायचं होतं. दरम्यान, जयानगर येथील अशोका पीलर इथं दोन गाड्यांनी या कॅश घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवलं.

Bengaluru CMS Cash Van Looted
Sambhajinagar Crime : प्रेयसीच्या पतीला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण; अपहरण करून रस्त्यावर फेकले

आम्ही आरबीआयचे अधिकारी आहोत

कॅश घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये चालक बिनोद कुमार याच्याव्यतिरिक्त आफताब, गनमॅन राजन्ना आणि तमैह यांचा समावेश होता. हॅचबॅक गाडीतून तीन माणसं उतरली त्यानंतर पाठीमागून इनोव्हा गाडी देखील आली. या माणसांनी आम्ही RBI चे अधिकारी आहोत असं सांगितलं. तुमच्या कंपनीविरूद्ध आमच्याकडे तक्रार आली आहे. तुम्ही RBI च्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. आम्हाला तुमचा जबाब घ्यायचा आहे असं सांगितलं.'

कॅश घेऊन जाणाऱ्या सीएमएस स्टाफला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला. दोन गनमॅन राजन्ना आणि तामैह यांनी त्यांची शस्त्रे गाडीत बाजूला ठेवली होती. त्यानंतर त्यांनी कस्टोडियन सोबत गाडीत प्रवेश केला.

Bengaluru CMS Cash Van Looted
Crime News | दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रावर संशय का? 'व्हाईट कॉलर टेरर'ची पाळेमुळे उघड!

गाडी फ्लाय ओव्हरवर घ्यायला लावली

यानंतर एका गुन्हेगारानं कॅश व्हॅन ड्रायव्हरला गाडी डेरी सर्कल फ्लायओव्हरवर घ्यायला सांगितलं. हे ठिकाण अशोका पीलरपासून ३ किलोमीटर लांब आहे. तिथं RBI च्या अधिकाऱ्यांची वाट पाहण्यास सांगितलं. ज्यावेळी कुमार सीमएस स्टाफला घेऊन जाणारी गाडी घेऊन पुढं चालला होता. त्यावेळी या कथित आरबीआयच्या अधिकाऱ्यांची गाडी त्यांना क्लोजली फॉलो करत होती.

ज्यावेळी हे सर्वजण निमहानस जंक्शन इथं पोहचले त्यावेळी ती पैसे घेऊन जाणारी गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर एका कथित आरबीआय अधिकाऱ्यानं CMS स्टाफला गाडी सोडून पोलीस स्टेशनला येण्यास सांगितलं. तिथं तुमचा जबाब नोंदवण्यात येईल. त्यापूर्वी आम्हाला कॅशचे बॉक्स आरबीआयमध्ये घेऊन जावे लागतील असंही सांगितलं.

Bengaluru CMS Cash Van Looted
Bihar Bank Loot : बिहारमध्ये बँक दरोड्याचा थरार; कर्मचाऱ्यांसह ग्राहक ओलीस ठेवत १६ लाखांची लूट

तिघांना गाडीतून उतरवलं

दरम्यान, सीएमएस स्टाफ हे जवळच्याच सिद्दपुरा पोलीस ठाण्याकडे चालत जाऊ लागले. दरम्यान, पैशाची व्हॅन घेऊन जाणारा ड्रायव्हर कुमार हा सीएमएस व्हॅन डेरी सर्कल फ्लाय ओव्हरकडे घेऊन गेला. तो तिथं वाट पाहत उभा होता.

दरम्यान, कथित आरबीआय अधिकाऱ्यांची गाडी ड्रायव्हर कुमारच्या जवळ येऊन थांबली. त्यातील गुन्हेगारांनी गनपॉईंटवर सर्व कॅश बॉक्स हे आपल्या गाडीत भरले. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हे आरबीआयचे अधिकारी बनून आलेले दरोडेखोर कॅश घेऊन पसार झाले.

Bengaluru CMS Cash Van Looted
Satara Encounter: सातारा पोलिसांकडून दरोडेखोराचा एन्काऊंटर

पोलिसांची प्रतिक्रिया

याबाबत बोलताना बंगळुरू पोलीस कमिशनर सीमांत कुमार सिंह म्हणाले की, 'आम्ही या दरोड्याचा सर्व अँगल्सनी तपास करत आहे. सीएमएसनं उशीरा आमच्याकडे तक्रार केली. दोन डीसीपी आणि एक सह आयुक्त हे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमचं नेतृत्व करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news